आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्पोरेट ट्रेंड:खादी, कॉटनच्या कपड्यांना तरुणाईची पसंती ; 20 ते 25 टक्क्यांनी मागणी वाढली

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी करताना तरुण- तरुणींमध्ये खादीचे कपडे खरेदी करण्याकडे वाढता कल असल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये अनेकांची खादी, कॉटनचे कपडे घेण्यास पसंती दिसून आली. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी खादी, कॉटनच्या कपड्यांची मागणी २० ते २५ टक्क्याने वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

पारंपारिक कुर्ते, जीन्ससह बेसकोट व प्रिंटेड रेडिमेड कपड्यांच्या खरेदीकडे यंदा ग्राहकांचा कल होता. सध्या हातमागावर तयार होणाऱ्या मुलायम कपडे वापरण्याचा ट्रेंड वाढत आहे. हातमागावरील कपड्यांमुळे त्याचा लुक तसेच मुलायमपणा ग्राहकांना आकर्षित करत आहे. डेनिम व कॉटन ट्रेंड यामध्ये सुद्धा प्लेन व प्रिंटेड कपड्यांचा पर्याय ग्राहकांसाठी दुकानदारांकडून उपलब्ध करुन दिला जात आहे. खादीचे कपडे वापरण्याकडे नागरिकांचा विशेष कल आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये खादीच्या शर्टचे सेल अनेक ठिकाणी दिसत आहेत. दुकानामध्ये खादीचा कुर्ता, लेडीज कुर्ता, ड्रेस मटेरियल, पुरूषांसाठीचे रूमाल, लुंगी, लहान मुलींसाठी कॉटनमधील परकर पोलकं, मुलांसाठी धोती-कुर्ता, हातमागावर विणलेल्या साड्या, कपड्यांचे तागे, धोतर, अगदी कापडी हॅण्डबॅगची सुद्धा विक्री जोरात होत आहे. मुख्य म्हणजे कार्पोरेट कंपन्यांमध्येही हातमागावरच्या कापड्यांना मागणी आहे. याचा चांगला परिणाम व्यवसायावर हाेत आहे.

कॉटनच्या कपड्यांमुळे उन्हाळ्यात हवेशीर आणि हिवाळ्यात उबदारपणा जाणवतो. शिवाय शरीरावर कोणताही दुष्परिणामही होत नाही. त्यामुळे बहुगणी कपड्यांना पूर्वीपेक्षाही अधिक पसंती वाढली आहे. व्हाइट कॉटनचे खादीमध्येच बारा ते तेरा प्रकार आहेत. खण आळी व वेगवेगळ्या दालनामध्ये महिलांसाठी लाछा, ट्रेंडी कुर्ता, पारंपरिक सलवार कमीज, साड्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असून, सवलतीच्या योजनांमुळे महिला वर्गानेही खरेदीसाठी अनुकुलता दाखवली आहे.

बातम्या आणखी आहेत...