आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध‎ कार्यक्रम:श्री रामनवमी उत्सवानिमित्त‎ श्रीराम मंदिरात खांब रोहन‎

अकोला‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गजानन महाराजांच्या पावन‎ स्पर्शाने पवित्र झालेल्या मोठ्या‎ राम मंदिरात ११७ वर्षांच्या‎ परंपरेनुसार श्रीराम जन्मोत्सवाची‎ तयारी सुरू झाली आहे. सोमवारी‎ १३ मार्चला मंत्रोपच्चारात श्रीराम‎ हरिहर संस्थेच्या अध्यक्षा‎ सुमनदेवी अग्रवाल, सोनल शहा‎ यांच्या हस्ते खांब रोहन करण्यात‎ आले. हेमंत शर्मा, प्रशांत‎ मेहरेकर, घनश्याम शर्मा यांनी‎ पूजा केली.‎ स्व. बच्चुलाल अग्रवाल यांनी‎ स्थापन केलेल्या मोठ्या राम‎ मंदिरात दरवर्षी पंधरा दिवसांचा‎ उत्सव साजरा होत असतो. यंदाही‎ २१ मार्च ते सहा एप्रिलपर्यंत विविध‎ कार्यक्रम आयोजित करण्यात‎ आले आहे.

समितीच्या अध्यक्षा‎ सुमनदेवी अग्रवाल, विजय‎ अग्रवाल, विनायक शांडिल्य‎ गुरुजी, मनीष शहा, कल्याण‎ शेवटी या यांच्या मार्गदर्शनात‎ विविध कार्यक्रम आयोजित केले‎ आहे. मुंबई येथील नारदीय‎ कीर्तनकार अविनाश परांजपे यांचे‎ बुधवारी २२ मार्च पासून राम मंदिर‎ परिसरात कीर्तनाचा कार्यक्रम‎ होणार आहे. शहरातील विविध‎ भागात कार्यरत मातृ शक्ती यांच्या‎ भजनी मंडळाचे कार्यक्रम श्रीराम‎ मंदिरात होणार आहे. सहा‎ एप्रिलला महाप्रसादाने‎ कार्यक्रमाची सांगता होईल.‎

बातम्या आणखी आहेत...