आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणगौरव सोहळा:खंडेलवाल ज्ञानमंदिर स्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गाेरक्षण रोड स्थित खंडेलवाल ज्ञानमंदिर स्कूलमध्ये शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयाेजित केला हाेता. या कार्यक्रमाचे आयोजन खंडेलवाल चॅरिटेबल ट्रस्ट, खंडेलवाल वैश्य सभा, खंडेलवाल महिला मंडळ तसेच खंडेलवाल युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

याप्रसंगी शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ज्ञानप्रकाश खंडेलवाल, उपाध्यक्ष प्रमोद खंडेलवाल, सचिव दीपक खंडेलवाल, गोपाल खंडेलवाल, डॉ. पद्मजा महाजन, पुरुषोत्तम खंडेलवाल, मधुर खंडेलवाल, सदस्य प्रमोद खंडेलवाल, ममता मोहोकर, मनोज खंडेलवाल, अध्यक्ष रवींद्र खंडेलवाल, सचिव खंडेलवाल, वैश्य सभा भावना खंडेलवाल, नेहा खंडेलवाल, खंडेलवाल महिला मंडल नमन खंडेलवाल, मोहित खंडेलवाल, युवा संघटन व शाळेच्या प्राचार्या मुग्धा कळमकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका चौहान यांनी केले, तर आभार पवन देशमुख यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...