आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खंडेलवालच्या बालनाट्याने पटकावला विश्वास करंडक

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवात खंडेलवाल इंग्लिश स्कूलच्या ‘आणि सदाफुली रंगीत झाली’ नाट्याने प्रथम क्रमांक पटकावत ‘विश्वास करंडक’ जिंकला. राजेश्वर कॉन्व्हेंटचे ‘एक नवाब की मौत’ द्वितीय, तर आरडीजी पब्लिक स्कूलचे ‘रुक्माई’ नाटकास तृतीय पारितोषिक मिळाले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात तीन दिवसीय स्पर्धेत एकूण २७ नाटके सादर करण्यात आली.

याप्रसंगी उत्तेजनार्थ नाटक प्रथम क्रमांक स्कूल ऑफ स्कॉलर्स बिर्ला कॉलनी, द्वितीय प्रभात किड्स स्कूलचे नाटक ठरले. उत्कृष्ट अभिनय मुलांमध्ये प्रथम श्रेयस इंगळे, द्वितीय निखिल खंदारे, तृतीय अथर्व महल्ले, मुलींमधून प्रथम अदिती वानखडे, द्वितीय उत्तरा पुरकर, तृतीय समृद्धी शिरसाट, उत्कृष्ठ दिग्दर्शन प्रथम वृषाली जोशी, द्वितीय डॉ. प्रदीप अवचार, तृतीय संघमित्रा चंदनखेडे व नागसेन इंगळे यांना देण्यात आले.

उत्कृष्ट प्रकाश योजनेकरिता प्रथम अजय बहाल, द्वितीय ओम पाटील, तृतीय अठायकर, उत्कृष्ट वेशभूषा प्रथम साधना बोबडे, द्वितीय स्मिता पारसकर व मीनाक्षी मोहोड, तृतीय रश्मी नवघरे, दीपिका राजूरकर, उत्कृष्ट संगीत प्रथम अनुल देशमुख, द्वितीय अभिषेक अडसुले, नंदकिशोर डंबाळे, उत्कृष्ट नेपथ्य प्रथम राम कडर व अनुज खकडे, द्वितीय सौरभ महल्ले, तृतीय वैशाली देशमुख, नवीन संहिता लेखकाचा पुरस्कार स्कूल ऑफ स्कॉलर बिर्ला कॉलनी, विशेष समीक्षक पुरस्कार पुंडलिक बाबा विद्यालय चांदूर नाटकास, समीक्षक म्हणून विष्णू निंबाळकर यांनी काम पाहिले. सर्व नाटकातील बाल कलावंतांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. त्यात अंकिता वानखडे, आदिनाथ पांडे, शामल धोटे, रेणुका म्हैसने, सई खाकरे, नयन जाधव, कृष्णा शर्मा, चंचल सपकाळ, अक्षरा सौंदळे, अदिती इंगळे, अथर्व अग्रवाल, रुद्र जानोरकर, साक्षी लहाने, कृष्णा तराळे, अथर्व कोरडे, तृप्ती घावट, हर्षदा काशिद, पार्थ बेहरे, मनसब खान मुहाजिद खान, अश्विनी पागृत, ईश्वरी काळमेघ, सानिका गावंडे, परिधी बावनेर, सोनम पट्टे, आयुष गावंडे व तन्वी देशमुख या बाल कलावंतांचा समावेश आहे.

बक्षीस वितरणाला यांची उपस्थिती कार्यक्रमाच्या प्रारंभी जेआरडी टाटा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात विश्वास करंडक नाट्यगृहात आणला. बक्षीस वितरण कार्यक्रमास माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, कॉप आर्टिस्ट राजेंद्र गोळे, परीक्षक धनंजय सरदेशपांडे, यतीन माझीरे, गिरीश फडके, प्रा. मधू जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे व नाट्य लेखक विष्णू निंबाळकर उपस्थित होते. अतिथींसह प्रदीप खाडे, ज्येष्ठ नाट्य कलावंत अरुण घाटोळ, पुष्पा गुलवाडे व अशोक ढेरे यांच्या हस्ते विजेत्या पुरस्कार प्रदान करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...