आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत हरित महासिटी कंपोस्ट वापरण्यास नगरपरिषद्वारे तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खताला हरित महासिटी कंपोस्ट ब्रांड देण्यात आला आहे. राज्यातील शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करताना शहरात निर्माण होणाऱ्या विघटन शील यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताची विपणन व विक्री करण्यासाठी हरित महा सिटी कंपोस्ट हा शासनाचा नोंदणीकृत ब्रँड वापरण्याची काही अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. विविध माध्यमाच्या आधारे शहरात ओला व सुका कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती करून संकलित केला जातो.
संकलित केलेला कचरा शहराच्या बाहेर डम्पिंग यार्डवर विलगीकरण करण्यात येते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. तयार झालेले कंपोस्ट खत शासनाच्या मानकानुसार उत्तम दर्जाचे आहे. यामध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डम्पिंग यार्ड वर विविध वेगवेगळे आधुनिक उपक्रम राबवले जातात. उपलब्ध रिकाम्या जागेत परसबाग तयार करण्यात आली आहे. यामध्ये कोथिंबीर, पालक, मेथी, टोमॅटो, वांगे, शेपू इत्यादी पालेभाज्या घेतल्या जातात. या सर्व आधुनिक उपक्रमात आरोग्य व पाणीपुरवठा अभियंता राजू घोडके, शहर समन्वयक नवीन देशट्टीवार व नगर परिषदेचे सर्व सफाई कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. कंपोस्ट खताच्या विक्री पासून शेतकऱ्यास व नगरपालिकेस नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.