आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद:नुकसानाच्या पंचनाम्यात खाेडताेड; पीक विम्याच्या माेबदल्यावर परिणाम

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामातील पीक िवमा याेजनेअंतर्गत नुकसान भरपाई केलेल्या पंचनाम्यात खाेडताेड करण्यात आल्याचे उजेडात आले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांना िमळालेल्या नुकसान भरपाईवर झाला आहे. याप्रकाराला जबाबदार काेण? असा सवाल जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विराेधक असलेल्या शिवसेनेने कृषी िवभागावर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर यावर आता चाैकशी करून कारवाई करण्याचे प्रभारी एसएआेंनी (जिल्हा अधीक्षक कृषी) सांगितले.

यंदा खरीपासह रब्बी हंगामातही प्रचंड पाऊस झाला. संततधार व अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचले व पिके सडली. पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांच्या प्रादुर्भावाचाही िपकांना फटका बसला. शेतकऱ्यांनी पीक िवमा याेजनेअंतर्गत विमाही उतरवला हाेता. मात्र शेतकऱ्यांना अल्प माेबदला िमळत असल्याने ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान या मुद्द्यावर शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली.

सभेत अशी झाली चर्चा पीक िवम्याअंतर्गत तुटपुंजी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आल्याचे शिवसेनेचे गटनेते गाेपाल दातकर म्हणाले. काेणाला ९० तर काेणाला ५०० रुपये मंजूर करण्यात आले. अनेकांचे क्षेत्रही कमी दाखवण्यात आले. याला जबाबदार काेण, असा सवाल त्यांनी केला. यावर याबाबत संबंिधतांना पत्र देऊन दाेषी आढळून येणाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात येईल, असे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा जिल्हा कृषी िवकास अधिकारी डाॅ. मुरली इंगळे यांनी सांगितले.

म्हणे पदे रिक्त : पीक नुकसान पंचनामे, मदत याबाबत शिवसेनेने स्थायी समितीच्या सभेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. कृषी िवभागात पदे िरक्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर शेतकऱ्यांना न्याय कसा िमळेल, िरक्त पदे असल्याने तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करणार काय, असे एक ना अनेक सवाल शिवसेनेचे गाेपाल दातकर यांनी केले. िरक्त पदांबाबत शासनाकडे पाठपुरावा करा, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...