आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षांची शिक्षा:अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग; आरोपीला ठाेठावली दहा वर्षांची शिक्षा

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलगी खेळत असताना तिला फूस लावून तिचे अपहरण केले व तिचा विनयभंग केला. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल शुक्रवारी दिला.

शिवकुमार उर्फ शिवा नीळकंठ बोंद्रे (वय ३७ रा. मनकर्णा प्लॉट शिवाजी कॉलेज रोड गवळीपुरा) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत १९ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी सहा वाजता जवाहर नगर अकोला येथे संभाजी पार्कमध्ये स्किपींग करण्यासाठी व झोका खेळण्यासाठी सायकलने गेली होती. या वेळी आरोपी हा चार पाच दिवसांपासून तिला खेळताना बघायचा.

मुलगी खेळत असताना आरोपीने तिला सांगितले की, तुझी सायकल कोणीतरी मुलगा घेऊन गेला आहे व मी त्याला पाहिले आहे. असे म्हणून त्याने तिला त्याच्या दुचाकीवर बसवले व तो तिला पीकेव्ही परिसरात घेऊन गेला. तेथे त्याने तिचा विनयभंग केला. मुलीने त्याच्या तावडीतून सुटका केली व पळून आली होती. त्यानंतर मुलगी व तिची आई सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविचे कलम ३६३,३६६ अ,३५४ ब, ३५४ ड व कलम ७,८,११,१२,१८ पोक्सो कायदा व कलम ८४ जे.जे. अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...