आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:समृद्धी महामार्गावर झालेल्या‎ भीषण अपघातात एक जागीच‎ ठार; तीन जण जखमी‎

मेहकर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी कामासाठी गेलेल्या व्यापाऱ्याचा‎ औरंगाबाद येथून परत येत असताना‎ ‎ समृद्धी महामार्गावरील‎ ‎ जालन्याजवळ‎ ‎ झालेल्या कार‎ ‎ अपघातात एक जागीच‎ ‎ ठार झाला असून तीन‎ ‎ जण जखमी आहेत.‎ ‎ जखमींमध्ये येथील‎ महेश अर्बन क्रेडिट सोसायटीचे संचालक‎ चंद्रकांत सावळे आणि सुनील निंबकर व‎ चालक योगेश तांगडे यांचा समावेश असून‎ त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ही घटना‎ रविवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या‎ सुमारास घडली.‎ शहरातील चार व्यावसायिक हे खासगी‎ कामानिमित्त एम एच २८ /बिके /३१०० या‎ क्रमांकाच्या कारने औरंगाबादला गेले होते.‎ काम आटोपून परत मेहकर कडे परत येत‎ असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. हा‎ अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप‎ समजले नसले तरीही समृद्धी महामार्गावर या‎ कारने तीन ते चार पलट्या खाल्याने कार‎ चक्काचूर झाली आहे. अपघातात बळीराम‎ खोकले हे ठार झाले असून अपघातातील‎ जखमी सुनील निंबेकर यांच्यावर जालना‎ येथे तर चंद्रकांत सावळे यांच्यावर‎ औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...