आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकौलखेड रोड, गायत्री नगराच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत तुकाराम महाराज बीजोत्सवाचे निमित्त ह भ प प्रशांत महाराज ताकोते यांच्या मार्गदर्शनात होळीच्या शुभ-परवावर म्हणजेच शुक्रवार दिनांक 9 ते शुक्रवार 17 मार्च दरम्यान नऊ दिवस रात्री आठ ते दहा या वेळात भव्य कीर्तन महोत्सव रंगणार आहे.
हा महोत्सव राज्यस्तरीय असल्याने शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील भाविक या कार्यक्रमाची फार उत्सुकतेने वाट बघत असतात. विशेष म्हणजे या सप्ताहात संत तुकाराम महाराजांचा बीज उत्सव, एकनाथ महाराजांची षष्ठी व तिथीनुसार शिवजयंती असा त्रिरत्न उत्सवांचा योग असतो. या सप्ताह दररोज अखंड विना सकाळी पाच ते सहा काकडा, दहा ते बारा व दुपारी तीन ते पाच गाथा पारायण, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री आठ ते दहा दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची हरिकीर्तने होणार आहे.
9 मार्च रोजी ह भ प डॉ. जलाल महाराज सय्यद नाशिक, 10 मार्च रोजी हभप चैतन्य महाराज देहूकर पंढरपूर, 11 मार्च रोजी हभप अशोक महाराज इलग शास्त्री शेवगाव, 12 मार्च रोजी हभप गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री डोंगरगण,13 मार्च रोजी हभप चकोर महाराज बाविस्कर पारोळा, 14 मार्च रोजी सोपान महाराज काळपांडे मूर्तिजापूर, 15 मार्च रोजी भाषाप्रभू हभप जगन्नाथ महाराज पाटील मुंबई, 16 मार्च रोजी वारकरी भूषण हभप उमेश महाराज दशरथे परभणी व 17 मार्च रोजी सायंकाळी सहा ते सात या वेळात गुरुवर्य हभप अमृताआश्रम स्वामी महाराज बीड यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. गायनाचार्य म्हणून हभप कृष्णा महाराज घोडके, किशोर महाराज लढे व दिलीप महाराज काळबागे मृदंगाचार्य म्हणून हभप ज्ञानेश्वर महाराज यादगिरी अकोला व चंद्रकांत महाराज बागल मृदंग विशारद आळंदी तर टाळकरी मंडळी संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ मंडळ देगाव व गायत्री नगर कौलखेड खडकी उमरी यांची साथ संगत लाभणार आहे. कीर्तन महोत्सवाचा लाभ भाविकानी घ्यावा, असे आवाहन संत तुकाराम महाराज बीज उत्सव सेवा समितीने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.