आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्सिजन संपल्याने मृत्यू:ऑक्सिजनवर संशोधन करणारे कोल्हापूरचे प्रा. डॉ. काकडे यांचे ऑक्सिजनअभावी निधन, चेन्नईतील सरकारी रुग्णालयात घेत होते उपचार

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जपानमधील टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंधननिर्मितीबाबत संशोधन

ऑक्सिजनचा सूक्ष्म गुणधर्म शोधणाऱ्या संशोधकाचाच अखेरच्या क्षणी ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला. कोल्हापूरचे ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचा चेन्नईत कोरोनाने बळी घेतला. जीवघेण्या आजारात ऑक्सिजनची संजीवनी देऊन जीवदान देणाऱ्या हा दिग्गज संशोधक वयाच्या 44 व्या वर्षातच ऑक्सिजनच्या कमतरतेचा बळी ठरला, ही बाब तमाम कोल्हापूरकरांनाही चटका लावणारी आहे. काही दिवसापूर्वी त्यांना करोनाची बाधा झाली. किरकोळ लक्षणे असल्याने चार दिवस त्यांनी घरातच उपचार घेतले. पण, एक दिवस प्रकृती बिघडल्या ने त्यांना चेन्नई येथील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दोन दिवस त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सुधारली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ते उपचाराला अतिशय चांगला प्रतिसाद ते देत होते. पण, मंगळवारी रात्री उशिरा अचानक त्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला. यामुळे तेथे उपचार घेत असलेल्या दहा जणांचा तडफडून मृत्यू झाला. त्यामध्ये काकडे यांचाही समावेश होता. ऑक्सिजनच्या दिग्गज संशोधकाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. पण त्या प्रयत्यांनाही अपयशच पाहावे लागले.

रसायनशास्त्रातली उच्चपदवी घेऊन त्यांनी संशोधन सुरू केले. जगभरातील अनेक देशांनी दिलेली ऑफर नाकारून त्यांनी भारतातच संशोधन करण्याचा निर्णय घेतला. सध्या ते चेन्नई येथील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेत प्राध्यापक व संशोधक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत संशोधक म्हणून काम करत होत्या.

डॉ. काकडे हे शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी घेऊन फेलोशीप मिळवून पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळा, जपानमधील टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंधननिर्मितीबाबत संशोधन केले. त्यातून निर्माण होणार्या सकारात्मक ऊर्जेने रेल्वे धावू शकेल, याचा ध्यास घेतला. वीस वर्षे त्यांनी या संशोधनात व्यतित केली. ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक ऊर्जा निर्माण करून त्याव्दारे रेल्वेही धावू शकेल, असे संशोधन त्यांनी सुरू केले आणि जाताजाताच इंधननिर्मिती व प्लॅटिनमच्या विविध संशोधनात आंतरराष्ट्रीय स्तरावर सात पेटंटही मिळवले. ऑक्सिजन क्षेत्रातील हा गुरूतुल्य माणूस कोरोनाचा लक्ष्य ठरला.

  • जपानमधील टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंधननिर्मितीबाबत संशोधन
  • ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक ऊर्जा निर्माण करून त्याव्दारे रेल्वेही धावू शकेल, असे संशोधन त्यांनी सुरू केले
  • इंधननिर्मिती व प्लॅटिनमच्या विविध संशोधनात आंतरराष्ट्रीय स्तरावर सात पेटंटही मिळवले.
बातम्या आणखी आहेत...