आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानीचे आंदोलन:शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला सरकारचे दुर्लक्ष; संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण अभियंताचे कार्यालय पेटवले

कोल्हापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना दिवसा सलग दहा तास वीज देण्याच्या मागणीबरोबरच महावितरणाचा भोंगळ कारभाराच्या विरोधात कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुधवारपासून धरणे आंदोलनाला सुरुवात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला सरकार दुर्लक्ष करत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कागल (जिल्हा. कोल्हापूर) येथील महावितरण कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवून दिले.

छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक दल आणून आग आटोक्यात आणण्याचा महावितरणचा प्रयत्न सुरू आहे. राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी संतप्त झाल्याने आज दिवसभरात राज्यात आंदोलनाची भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकऱ्यांना दहा तास वीज देण्यात यावी, तसेच महावितरणाचा भोंगळ कारभार या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली होती. बुधवारपासून शेतकरी स्वाभिमानीच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर आंदोलने करत होती. शेतकऱ्याला किडा मुंगी समजू नका, अन्यथा याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

वीज नसली तरी शेतात काम करायला जावेच लागते. रात्रीच्या विजेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जीवाला धोका होणाऱ्या घटना घडत आहेत. मात्र, तरीही शेतकऱ्याला रात्रीचा वीजपुरवठा केला जात आहे, तोही कमी दाबाने आणि अनियमित आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना देखील शेतकऱ्यांना रात्री वीजपुरवठा का? असा सवालही यावेळी शेट्टी यांनी उपस्थित केला. शेतकरी कोणत्याही प्रकारची वीज चोरी करत नाही. वीज गळती होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे दिवसा वीज मिळणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, अशा भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

शेतीला सलग दहा तास वीज पुरवठा करा, शेती पंपाची चुकीची वीजबिले तातडीने दुरुस्त करा. अन्यायी वीज बिल वसुली त्वरित थांबवावी आदी मागण्या स्वाभिमानी संघटने केल्या आहेत. या मागण्यावर जो पर्यंत निकाल लागत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा माजी खासदार शेट्टी यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...