आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी‎:अकोट सत्र न्यायालयात क्रांतिज्योती‎ सावित्रीबाई फुले जयंती साजरी‎

अकोट‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट‎ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या‎ जयंतीनिमित्त सत्र न्यायालयात कार्यक्रम‎ घेण्यात अाला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा‎ पूजन करुन अभिवादन करण्यात आले.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा‎ न्यायाधीश तथा तालुका विधि सेवा‎ समितीचे अध्यक्ष चकोर श्रीकृष्ण‎ बाविस्कर होते.‎ दिवाणी न्यायाधीश भगवान चिकणे, सह‎ दिवाणी न्यायाधीश भानुप्रताप चौहाण, सह‎ दिवाणी न्यायाधीश विनायक रेडकर‎ अादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या‎ सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले‎ यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित‎ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.‎

यावेळी जिल्हा न्यायाधीश चकोर‎ बाविस्कर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई‎ फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकून‎ कार्यक्रमास उपस्थित कर्मचाऱ्यांना‎ शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास न्यायालयीन‎ कर्मचारी, तालुका विधी सेवा समिती‎ सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी‎ अधीक्षक प्रशांत शेंडे, समाजसेवक‎ विजय जितकर अादींनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...