आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘कुलट यांची कविता सुबोध, सुलभ’;विठ्ठल कुलट यांच्या काव्यसंग्रहास काव्यउन्मेष पुरस्कार

अकोट7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरस्काराकरीता कविता संग्रहाची नविड करताना फार मोठी कसोटी लागते. कवितेची भाषा, शब्दांची उंची, भावना, वास्तविकता, प्रतिमा, प्रतिकांची समर्पकता, पुस्तकाचे बाह्य, अंतरंग आदी अनेक बाबी काळजीपूर्वक तपासाव्या लागतात. विठ्ठल कुलट यांची कविता सुबोध आणि सुलभ आहे. माणसाच्या जवळची आहे. गुणंवैशिष्ट्यांनी निपूण आहे, असे मत समीक्षक व कवयित्री प्रा. जान्हवी शिराळकर यांनी व्यक्त केले. कल्याण- डोंबविली येथील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कल्याण- डोंबविली येथील गणेश मंदिर वनिायक सभागृहात १३ मार्चला एकदविसीय वार्षिक मराठी साहित्य संमेलन झाले. संमेलनातील पुरस्कार वितरण सोहळ्यात विठ्ठल कुलट यांच्या ‘सत्तेत होरपळणारी सत्यवान माणसं’ या काव्यसंग्रहास कवी कै. अनिल साठ्ये स्मृती काव्यउन्मेष पुरस्काराने, २५ हजार रुपये रोख रक्कम, स्मृतीचनि्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, काव्यउन्मेष पुरस्काराकरीता राज्यभरातून एकूण १२५ काव्यसंग्रह आले होते.

कवितेची व्याप्ती लक्षात घेऊन कुलट यांच्या काव्यसंग्रहाची नविड करण्यात आली आहे. या वेळी त्यांनी संग्रहातील नविडक कवितांचे वाचन व रसग्रहण केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गझलकार मोमीन शेख होते. तर काव्य रसिक साहित्य मंडळाचे अध्यक्ष महेश देशपांडे, हेमंत राजाराम, डॉ. आनंद प्रधान, स्वाती भाट्ये, सानिका गोडसे, जितेंद्र पेंढरकर, प्राची गडकरी, जयंत कुलकर्णी, मृणाल केळकर, रामचंद्र साळुंखे, उज्वला लुकतुके, मंजुषा बुरुजवाले यासह प्रतिभा साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष अरुण काकड, प्रतिभा कुलट, अरुण सांगळोदकर, डॉ.उदय सांगळोदकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...