आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:कुरणखेडच्या शोध पथकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव

कुरणखेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कचेरीत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी निमा अरोरा अकोला, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख संदीप साबळे, तलाठी सुनील कल्ले, तलाठी हरिहर निमकंडे यांच्याकडून वंदे मातरम् आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड अध्यक्ष उमेश आटोटे, उपाध्यक्ष गौतम मोहोड, मनीष मेश्राम, नितेश मोहोड, दिलीप मोहोड, अविनाश गायकवाड, समाधान आटोटे, नितीन जामनिक, सिद्धार्थ शिराळे, नजर अली, धर्मशील मोहोड, सचिन मोहोड व अन्य सहकारी टीम यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी पथकाने आपत्ती काळात केलेल्या उल्लेखनीय कामाचे कौतुक करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या हस्ते टी- शर्टचे अनावरण करून सर्व सदस्यांना वितरित करण्यात आले. या वेळी जिल्ह्याचे सर्व प्रशासकीय अधिकारी, सुनील पाटील तहसीलदार अकोला, डॉ. नीलेश अपार उपविभागीय अधिकारी, सौरभ कटियार मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस प्रशासन, माजी सैनिक, वीरपत्नी व परिवार व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...