आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • 'L. Ra. The Tradition Of The Outcome Of It. Congratulations To The Students From The Principal And Office Bearers Along With The Principal |marathi News

दिव्य मराठी विशेष:‘ल. रा. तो.’च्या निकालाची परंपरा कायम; प्राचार्यांसह संस्थाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परिक्षेत श्रीमती ल. रा. तो. वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा अबाधित ठेवत बाजी मारली आहे. महाविद्यालयातील ७५३ विद्यार्थ्यांपैकी एकूण ७३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याची टक्केवारी ९८. १४ टक्के एवढी आहे.

महाविद्यालयाची विधी जखोटिया ही विद्यार्थिनी ६०० पैकी ५९० गुण (९८.३३%), घेवून प्रथम तर भूमी लोहिया हिला ६०० पैकी ५७६ गुण (९६ %) आणि ओम जामोदे याला ६०० पैकी ५७६ गुण (९६ %) घेवून संयुक्तपणे द्वितीय असून खुशी खेतान हिला ६०० पैकी ५७५ गुण (९५.८३ %) घेवून तृतीय ठरली आहे. महाविद्यालयातील ०६८ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. तब्बल ५७२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवून महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. असे मत प्राचार्य डॉ.एस.जी.चापके यांनी व्यक्त केले आहे.

यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अॅड. मोतीसिंह मोहता, पवन माहेश्वरी, विजय तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र जैन, सहसचिव अभिजित परांजपे व समस्त कार्यकारिणी सदस्य तसेच प्राचार्य डॉ.एस. जी. चापके यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी पर्यवेक्षक प्रा. राजू क्षिरसागर, प्रा.संजय पालडिवाल, प्रा.शारदा बियाणी, प्रा.अजय पालडिवाल, प्रा.संजय तिवारी, प्रा.प्रशांत राठी, प्रा.अतुल पिलात्रे, प्रा.प्रकाश गवई, प्रा. राजू राठोड, प्रा. के.एस. बोके, प्रा. एस. एन. अग्रवाल, प्रा. डी. के. सावजी, प्रा. स्वाती जोशी, प्रा. रेखा भड, प्रा. एस. जी. काबरा, प्रा. एन. जी. अवस्थि, प्रा. के .बी. तापडिया, प्रा. पी जी गुप्ता, कार्यालय प्रमुख श्री ए.एस. पालवे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...