आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएप्रिल सुरू झाला. पण उन्हाची तीव्रता मे सारखी जाणवत आहे. सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आगीच्या घटना वाढल्या आहेत. अशावेळी अग्निशामक दल मदतीला धावून येत आहे. मात्र, तेल्हारा येथील या महत्त्वाच्या विभागामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. तीन व्यक्तीवर विभागाची धुरा आहे. त्यामुळे मोठी घटना घडल्यास, त्याला विभाग कसे तोंड देणार? असा प्रश्न आहे.
अग्निशमन दलात तीनच लोक सेवा देत आहेत. ज्यात अधिकारी म्हणून रूपेश जोगदंड, फायरमन धनंजय विखे, वाहनचालक विजय आडे यांचा समावेश आहे. तेल्हारा परिसरात आगीच्या घटना झाल्या तेवढ्या तिघांनीच नियंत्रणात आणून आगीपासून होणारे नुकसान टाळले. प्रत्येक वेळा हे कर्मचारी मर्यादित मनुष्यबळात जीवाची पर्वा न करता काम करतात. गुरुवार ३१ मार्चला गाडेगाव शेत शिवारात प्रकाश गुजर यांच्या चाऱ्याला आग लागली. यात त्यांचे नुकसान झाले.
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणले. मात्र, पुरेशा मनुष्यबळाअभावी अग्निशमन दलाची दमछाक झाली. एक बंब संपून दुसरा बंब त्यांनाच भरुन आणावा लागला. या वेळी दुपारची उन्हाची वेळ आणि हवेचा वेग पण होता. अशावेळी आग वस्तीकडे पसरू शकत होती. पण एखादी घटना घडली तर दोष कुणाचा असेल? याचा प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.
अधिक, कर्मचारी भरण्यात येणार
सद्यःस्थितीत तेल्हारा अग्निशमन दलात एक अधिकारी, एक फायरमन आणि एक वाहनचालक कार्यरत आहेत. लवकरच अग्नी सुरक्षा अभियानांतर्गत लवकरच अधिक कर्मचारी वर्ग भरण्यात येणार आहेत.रूपेश जोगदंड, अधिकारी, अग्निशमन दल, तेल्हारा
रिक्तपदाची संख्या अधिक
तेल्हारा अग्निशमन दलात चार फायरमन असणे अपेक्षित आहेत. परंतु एकच फायरमन परिसरातील आपत्तींचे निवारणाचे काम करतो. त्यामुळे प्रशासनाने तेल्हारा अग्निशमन दलाच्या मनुबळात तातडीने वाढ करून विभागाला सक्षम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.