आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गवळीपुरा मार्गावरील रस्त्यालगतचे अतिक्रमण जमीनदोस्त:नाल्यावर बांधलेले पक्के बांधकाम, टिनशेड पथकाने हटवले

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी दि.15 गवळीपूरा मार्गावर रस्त्या लगतचे वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण जमिनदोस्त केले. पथकाने नाल्यावरील बांधलेले पक्के बांधकामही काढल्याने नाला सफाईचा मार्गही मोकळा झाला.

महापालिकेच्या वतीने 21 नोव्हेंबरपासून शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे. टप्प्या-टप्प्याने शहरातील सर्वच मार्गावर ही मोेहीम राबविली जात आहे. गुरुवारी ही मोेहीम गवळीपूरा भागात राबविण्यात आली. माळीपूरा चौकातून गवळीपूरा मार्गे तसेच होमिओपॅथीक कॉलेज पासून अकोला कृषी उत्पन्न समिती बाजारात जाता येते. कृषी उत्पन्न बाजार समितीत जाण्यासाठी हे दोनच मार्ग आहेत. यापैकी माळीपूरा चौक मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडीतून तसेच ट्रॅक्टरने आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत नेताना अडचणीचा सामना करावा लागत होता. अनेकांनी नाल्यावर बांधकाम केले तर अनेक दुकानदारांनी दुकाना समोर मोठ्या प्रमाणात टिनशेड उभारले. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने नाल्यावर बांधलेले पक्के तसेच कच्चे बांधकाम उध्वस्त केले. तसेच टिनशेड, पानठेले, चिल्लर सामानाची विक्री करणाऱ्या टपऱ्या निष्कासित केल्या. त्यामुळे नाला सफाईचा मार्गही मोकळा झाला आहे. दरम्यान पथकाने नाल्यावर अथवा वाहतुकीस अडथळा होईल, असे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करु नये, असे आवाहन केले.

अतिक्रमण केल्यास पुन्हा मोहीम राबविण्याचा इशाराही दिला. ही मोहीम उत्तर झोनचे झोनल अधिकारी विठ्ठल देवकते, सहाय्यक कर अधिक्षक हेमंत शेळवणे,नगररचना विभागाचे राजेंद्र टापरे,अतिक्रमण विभागाचे चंद्रशेखर इंगळे, प्रविण मिश्रा, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, वैभव कवाडे, सै.रफीक, योगेश कंचनपुरे, स्‍वप्‍नील शिंदखेडकर, गुलाम मुस्‍तफा, अब्‍दुल रज्‍जाक, स्‍वप्‍नील पवार, धिरज पवार, पवन चव्‍हाण, सोनु गायकवाड व अभिकर्ता चे अजिंक्‍य खाडे, नागेश हिरोळे, विशाल खंडारे, हरिश बोंडे, सागर भागवत, प्रशांत झाडे, सुरज लोंढ, नितिन सोनोने आदींनी राबवली.

बातम्या आणखी आहेत...