आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिका उत्तर क्षेत्रातील दगडी पुलाच्या बाजुने केलेले अधिकृत बांधकाम उत्तर झोन तसेच अतिक्रमण विभागाच्या वतीने जमिनदोस्त करण्यात आले. नझूल शिट क्रं. २७/ए, प्लॉट नं. ३९, दगडी पुलाजवळ, सावतराम मिल (एन.टी.सी.) च्या मालकीच्या जागेवर रवींद्र तिवारी यांनी १४० चौरस मिटरचे अनधिकृत बांधकाम केले असल्याबाबतची एन.टी.सी. तर्फे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीवरून उत्तर झोन क्षेत्रीय अधिकारी यांच्या निर्देशानुसार मनपा अतिक्रमण विभाव्दारे या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सहा.अतिक्रमण अधिकारी चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, सहा.नगररचनाकार राजेंद्र टापरे, उत्तर झोनचे कनिष्ठ अभियंता अक्षय बोर्डे, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, वैभव कवाडे, सै.रफीक, योगेश कंचनपुरे, स्वप्नील शिंदखेडकर, गुलाम मुस्तफा, अब्दुल राजीक, शोभा इंगळे, सविता सगळे, स्वप्नील पवार, धीरज पवार, पवन चव्हाण, सोनु गायकवाड व अभिकर्ता चे अजिंक्य खाडे, नागेश हिरोळे, विशाल खंडारे, हरिश बोंडे, सागर भागवत, प्रशांत झाडे, सूरज लोंढ, नितिन सोनोने आदींनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.