आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांना फटका:गतवर्षी सव्वालाख तर यंदा 80 हजार हेक्टरवरील पिकांना बसला फटका

अकाेला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात अतिवृष्टीने गतवर्षीप्रमाणे यंदाही पिकांचे नुकसान झाले. जून, जुलैत ७७,७४७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, गतवर्षी अर्थात २०२१मध्ये याच दाेन महिन्यात १ लाख २२ हजार हेक्टरवर नुकसान झाले हाेते. यंंदाच्या नुकसानासाठी ५८ काेटी ३२ लाख २४ हजार अपेक्षित आहे. महसूल, कृषी व जि. प. कर्मचाऱ्यांचा संयुक्त पंचनामा अहवाल मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयानेविभागीय आयुक्तांना सादर केला. मात्र पालकमंत्री नसल्याने शासनाकडून मदत निधी आणण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमाेर आहे.

जिल्ह्यात जून, जुलैत पुराने शेतातील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले. पिकांची हानी झाल्याने तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली. मात्र पेरणीसाठी पैसे कोठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला.

मुसळधार पाऊस,पुराने रस्ते उखडले असून, अनेक पुलाची दुर्दशा झाली. पुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत. या रस्त्यांची दुरुस्तीची गरज आहे. अतिवृष्टीचा कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, भाजीपाला या पिकांना फटका बसला. दरम्यान २ ऑगस्टला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षरीचा अहवाल आयुक्तांना सादर केला.

असा बसला क्षेत्रनिहाय फटका
काेरडवाहू : जिल्ह्यातील ७५,८३८ हेक्टर क्षेत्रावरील काेरवाहू पिकांचे नुकसान झाले असून, बांधित गावांची संख्या ५१४ आहे. यासाठी ५१ काेटी ५७ लाखांचा निधी अपेक्षित आहे.

बागायत : जिल्ह्यातील बागायती क्षेत्रातील १०१ हेक्टर जमिनीवरील पिकांची हानी झाली असून, १२४ गावातील पिके बाधित झाली. यासाठी किमान १३ लाख ६६ हजारांच्या निधीची गरज भासणार आहे.

फळ बागा : जिल्ह्यातील ८२.७५ हेक्टर क्षेत्रातील फळ पिकांची हानी झाली असून, यासाठी १४ लाख ८९ हजार नधी अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...