आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:आगर शाळेतून हर घर तिरंगाचा शुभारंभ

आगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, उर्दू शाळा व महात्मा फुले महाविद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत संयुक्त प्रभात फेरी काढली. या वेळी गावात उपक्रमाची जागृती करण्यात आली. राष्ट्रभक्तीपर गीत गायन व प्रभात फेरीने गावातील वातावरण देशभक्तमय बनले होते.

घरांवर राष्ट्रध्वज उभारण्यात आले. या वेळी जि. प. शाळेचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर मांडेकर, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर सिरस्कार, जि. प. उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अन्सार देशमुख, जि. प. सर्व शिक्षक महात्मा फुले महाविद्यालयाचे मुख्याध्यापक भोरखडे, आशुतोष काळणे, सरपंच निशा शिरसाट, उपसरपंच सुशीला खोले, माजी सरपंच राजेंद्र काळणे, शेषराव शिरसाट, ओम साखरकार, पत्रकार चेतन फुकट पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...