आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेवळ शैक्षणिक चळवळीच्या चौकटीत न राहता विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या प्रहार शिक्षक संघटनातर्फे गिलानी कॉलेज चौक येथे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद््घाटक म्हणून घाटंजी पोलिस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा बाविस्कर, पुरवठा निरीक्षक किरण भगत, सेवानिवृत्त प्राचार्य पंजाबराव डंभारे, होनबाजी डंभारे, पांडुरंग निवल उपस्थित होते.घाटंजी तालुक्याच्या टोकावरून चाळीस ते पन्नास किमी. वरून विविध कामानिमित्त येथे येणाऱ्या वृद्ध, महिला, लहान मुले, विद्यार्थी या सर्वांची तहान भागावी हा उदात्त हेतू पुढे ठेवून ही संकल्पना प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप डंभारे यांनी प्रत्यक्षात आणली.
मागील वर्षी सुद्धा उन्हाळ्यात त्यांच्या पुढाकाराने ही पाणपोई सुरू होती. यावेळी किशोर मालवीय तालुका अध्यक्ष, संतोष चौधरी, विनोद लोखंडे, आशिष जमदापुरे, पवन राऊत, मुकेश पसावत, किशोर मुनेश्वर, वीरेंद्र खडसे, सतीश गणवीर, गुलाब सिसले, सुरेश कस्तुरे, भगवान सरदार, अभय इंगळे, प्रफुल वातीले, प्रशांत दीडशे, पवन राठोड, आकाश ठाकरे, झाडे, प्रा. रवी आडे, प्रा प्रवीण गोडीले, संतोष येंनरवार, जुनेद नुर, राजेश वानखडे, राजेश मुनेश्वर, सचिन बागडे, सुमित ढगले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतुल वानखडे तर आभार निखिल पांगुळ यांनी केले. यशस्वितेसाठी प्रशांत चौधरी, योगेश निमकर, नंदु चौलमवार, नितीन येल्लरवार यांनी सहकार्य केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.