आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्ठेची पावती शंभर रुपयांच्या बाॅण्डपेपरवर:अकोला जिल्ह्यातून 1 हजार प्रतिज्ञापत्र घेऊन शिंदे गटाचे स्थानिक नेते मुबंईकडे रवाना

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेने शिवसैनिकांकडून पक्षप्रमुखांविषयी निष्ठेचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले त्यानंतर आता शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेनेचे पदाधिकारी असेच काहीसे प्रतिज्ञापत्र शिंदे गटासाठी लिहून देत आहेत. त्यामुळे दोन्ही गटात निष्ठेची लढाई लढली जात आहे.

शंभर रुपयांच्या बाॅण्डपेपरवर निष्ठा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत असलेली शिवसेनाच खरी शिवसेना असून, माझा शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, असे लिहून देण्यात येत आहे. तसेच माझा त्यांना विनाअट पाठिंबा असल्याचेही या 100 रुपयांच्या बाॅंड पेपरवर नमूद करण्यात येत आहे. जिल्ह्यातून 1 हजार प्रतिज्ञालेख तयार झाले असून, ते घेऊन मंगळवारी रात्री काही प्रमुख नेते मुबंईसाठी रवानाही झाले.

हे नेते मुंबईला रवाना

अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच शिवसेनेतही गटबाजी कमी नाही. या गटबाजीचा फायदा घेत शिंदे गटाला झाला. गटात माजी आमदार गाेपीकिशन बाजाेरीया व यांचे पूत्र आमदार विल्पव बाजाेरीया, उपशहर प्रमुख याेगेश अग्रवाल, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप, माजी नगरसेवक शशीकांत चाेपडे, अश्विन नवले आदींनी प्रवेश केला. दरम्यान मंगळवारी हे नेते, पदाधिकारी मुबंईकडे रवाना झाले असून, बुधवारी बैठकही हाेणार आहे.

काय आहे प्रतिज्ञापत्रात ?

शिंदे गटासाठी तयार करण्यात आलेल्या 100 रुपयांच्या बाॅण्डवर संबंधिताचे नाव, वय, पत्ता व स्वाक्षरी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख शिवसेनेचे मुख्य नेते (अध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारीणी) म्हणून करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीवर आधािरत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणारीच शिवसेना खरी आहे, असेही त्यात नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...