आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवन आनंदी व कृतार्थ करायचे असेल तर जीवनात जोखीम घ्यायला शिका, धोका पत्करल्याने आलेल्या संधीचे तुम्ही निश्चितच सोने करू शकता. म्हणून जीवनाचा उद्देश काय आहे, हे मनी बाळगून त्या दृष्टीने वाटचाल करा,’ असे आवाहन मुंबई येथील जीवन प्रेरक निशा चांडक यांनी केले. युवा अग्रवाल संमेलन व युवामंच मिडटाऊनच्या संयुक्त वदि्यमाने मुंबई येथील जीवन प्रेरक व नातेसंबंध समुपदेशक निशा चांडक यांचे मी व माझे जीवन या कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित व्याख्यान प्रमिलाताई ओक हॉल येथे झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्याख्यानाचा प्रारंभ म. रा. युवा अग्रवाल संमेलनचे मार्गदर्शक नीकेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनात व माजी आमदार बबनराव चौधरी, अग्रवाल संमेलनचे प्रांतीय उपाध्यक्ष रमाकांत खेतान, अग्रवाल समितीचे अध्यक्ष डॉ. जुगल चिरानिया, प्रियंका तोष्णीवाल, युवामंच मिडटाऊनच्या अध्यक्षा रुची गुप्ता, युवा अग्रवाल संमेलनाचे विभागीय अध्यक्ष रितेश चौधरी, शाखा अध्यक्ष शिवम अग्रवाल, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष सदि्धेश मुरारका यांच्या उपस्थितीत महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमा पूजनाने के ला. या व्याख्यानात निशा चांडक यांनी जीवनाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली पावर पॉइंटद्वारे सादर केली. त्या म्हणाल्या, जीवनातील समस्यांच्या संदर्भात स्वतःचीच तक्रारी करत त्याचे निरसन करायला सुरुवात करा. ज्याच्या त्याच्या जवळ समस्या अनंत आहेत. सर्वजण तक्रारीच करीत असतात. कोणी उद्योगाच्या , कोणी रोजगाराच्या , कोणी आरोग्याच्या संदर्भात, समाजात तक्रारीच सुरु असतात. मुलांना वडिलांचे विचार पटत नाहीत, सासूला सुनेचे विचार पटत नाहीत. जीवनातील नातेसंबंध हे अशाच पद्धतीचे सुरू आहेत. यावर सामंजस्याने तोडगा निघू शकतो. आपण या जगात का आलो? यासाठी काय केले पाहजिे? याची स्वतःचीच उकल करून आपल्यातच परिवर्तन करून नव्या समस्यांच्या निराकरणासाठी सामोरे गेले पाहजिे, असे त्यांनी या वेळी सांगितले. त्या म्हणाल्या, मोबाइलने सर्व जग पादाक्रांत केले असले तरी पिढी मोबाइलच्या नादी लागून जीवनातील वेळ नष्ट करीत आहे. ज्याप्रमाणे कारखान्यात एक दिवस यंत्रांना सुट्टी असते. तशीच सुट्टी आता मोबाइलला पण एक दिवस देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी या सांगितले. नीकेश गुप्ता यांनी युवा अग्रवाल संमेलन व मारवाडी युवा मंचच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक शिवम अग्रवाल यांनी केले, वक्ता परिचय केतन गुप्ता यांनी केले. संचालन प्रतीक अग्रवाल यांनी केले तर कृष्णा तातिया यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.