आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार मंथन‎:विदेशी नोकऱ्यांचे फॅड सोडा,‎ उद्योगाकडे वळा ;भरतीया‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘देशात तयार होणारा सक्षम‎ युवक नोकरीसाठी विदेशात‎ जातो, तिथेच स्थायिक होताे.‎ यामुळे देशातील बैद्धिक संपदा ‎ ‎ विदेशात जात आहेत. परिश्रम‎ आपले आणि नफा विदेशी कंपनी ‎ ‎ कमावतात. हे दृष्टचक्र असेच‎ सुरू राहिल्यास भविष्यातील ‎ ‎ उज्ज्वल भारत कसा तयार होईल.‎ त्यामुळे विदेशी नोकरीचे फॅड‎ कमी होऊन युवकांनी देशात‎ नोकरी किंवा व्यवसायास प्राधान्य‎ द्यावे. डिजिटल युगात भारतामध्ये‎ मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनी तयार‎ करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’‎ असे आवाहन काँफेडरेशन ऑफ‎ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटचे‎ राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया‎ यांनी केले.‎ श्री खंडेलवाल वैश्य सभातर्फे‎ व विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड‎ इंडस्ट्रीज, अकोला इंडस्ट्रीज‎ असोसिएशनच्या सहकार्याने‎ शनिवारी खंडेलवाल भवन‎ सभागृहात व्यापार परिसंवाद‎ दृष्टीक्षेप २०३० झाले.

या‎ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून‎ भरतीया मार्गदर्शन करीत होते. या‎ वेळी मंचावर काँफेडरेशन ऑफ‎ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटचे‎ राष्ट्रीय महामंत्री प्रवीण‎ खंडेलवाल, आममदार वसंत‎ खंडेलवाल, कॅटचे राष्ट्रीय‎ सचिव अशोक दालमिया,‎ खंडेलवाल वैश्य सभाचे अध्यक्ष‎ मनोज खंडेलवाल, विदर्भ‎ चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता,‎ अकोला इंडस्ट्रीज‎ असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेश‎ मालू आदी उपस्थित होते.‎ ते पुढे म्हणाले, २०३० ची‎ व्यापारी व उद्योगाची संकल्पना‎ लक्षात घेता आतापासूनच नव्या‎ आव्हानांना सामोरे जावे लागणार‎ आहे. व्यापाऱ्यांना नव्या नियमाचे‎ पालन करावे लागणार आहे.‎ टाईमली, कम्पलेटली व‎ करेक्टली हे सूत्र नव्या जोमाने‎ अंगीकारावे लागणार आहे.‎ आपल्या मुलाबाळासमवेतच‎ महिला व युवकांनाही या क्षेत्रात‎ नव्या जोमाने आले पाहिजे.‎ कारण युवा आज देशाची शान‎ आहे. मुलगी पण ही घराची लेक,‎ सून, आई आहे. अशा महिलांना‎ उद्योग क्षेत्रात आणून त्यांना नव्या‎ तंत्रज्ञानाने अवगत करून त्यांच्या‎ हातात व्यापाराची दोरी देणे आता‎ काळाची गरज झाली असल्याची भरतीया‎ यांनी या वेळी सांगितले.‎

कार्यक्रमात कॅटचे राष्ट्रीय सचिव‎ अशोक दालमिया यांनी मनोगत‎ व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत‎ खंडेलवाल वैश्य सभेचे अध्यक्ष‎ मनोज खंडेलवाल, विदर्भ चेंबरचे‎ पदाधिकारी आशीष चंदाराणा,‎ अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे‎ सचिव नितीन बियाणी, मनीष‎ खंडेलवाल, संजय सेठी,‎ ज्ञानप्रकाश खंडेलवाल, विजय‎ पनपालिया, शैलेंद्र कागलीवाल,‎ होलसेल किराणा मर्चंट‎ असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत‎ खेतान, कॅटचे प्रांतीय उपाध्यक्ष‎ वसंत बाछुका, ऑइल मिल ऑनर‎ असोसिएशनचे अध्यक्ष अशोक‎ गुप्ता, दाल मिल असोसिएशनचे‎ अध्यक्ष प्रमोद खंडेलवाल, सराफा‎ असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश‎ खरोटे आदींनी केले. संचालन‎ वैश्य सभेचे रमाकांत खंडेलवाल‎ यांनी केले. खंडेलवाल वैश्य‎ सभेचे सचिव रवींद्र खंडेलवाल‎ यांनी आभार मानले.‎

व्यापाऱ्यांनी डिजिटल होणे‎ काळाची गरज : प्रवीण‎ खंडेलवाल कॅटचे राष्ट्रीय महामंत्री‎ प्रवीण खंडेलवाल यांनीही २०३०‎ ची संकल्पना विशद केली. ते‎ म्हणाले, व्यापारात‎ डिजिटलीकरण वाढत आहे.‎ रिझर्व बँकेनेही आता डिजिटल‎ रुपया निर्माण केला आहे. यामुळे‎ आता चेक बुकची संकल्पना ही‎ हळूहळू नाहीशी होत आहे. शासन‎ डिजिटल रुपये बाजारपेठेत आणून‎ रोख रक्कम बाजारपेठेतून हळूहळू‎ नाहीशी होणार आहे. वास्तविक‎ ही काळाची गरज असून,‎ व्यापाऱ्यांनी पण स्वतःहून‎ डिजिटल होणे आता काळाची‎ गरज ठरली आहे.

गत काही‎ वर्षापासून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी‎ किरकोळ बाजारावर आक्रमण‎ केले असून, छोट्या वस्तू ही अशा‎ कंपन्या घरपोच देत आहेत. कॅटने‎ अशा बाबीची दखल घेऊन‎ न्यायालयीन लढा लढवून विजय‎ प्राप्त केला असल्याचे त्यांनी या‎ वेळी सांगितले.‎ व्यापार संमेनात यावर मंथन‎ - लोकसंख्या ५० टक्के वाटा,‎ महिलांना आर्थिक सक्षम करा -‎ २०२५ च्या स्वप्नातील भारतावर‎ मंथन व्हावे - लग्नानंतर महिलांना‎ व्यापारात सक्रीय ठेवा -‎ आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीचे‎ फॅड कमी व्हावे - मुलांना‎ व्यापाराचे धडे आवश्यक -‎ आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात‎ निर्माण करा‎

बातम्या आणखी आहेत...