आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी उद्या सोडत; प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज; विद्यार्थी राहणार वंचित

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियमाअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पाल्यांच्या अर्जांची सोडत सोमवारी ४ एप्रिलला काढण्यात येणार आहे. ही प्रक्रिया शासनस्तरावरच होणार आहे. तसेच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड यादीही होणार आहे. ही माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. प्रवेश पात्र मुलांच्या पालकांना याच दिवशी मोबाइलवर एसएमएस प्राप्त होतील.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. आरटीईमुळे पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे.यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली. पालकांना अर्जाची शेवटची संधी २८ फेब्रुवारी होती; मात्र ही मुदत १० मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. एकूण अर्ज करणाऱ्या पालकांची संख्या ६ हजार २ आहे.

संकेतस्थळावर खात्री करण्याचे आवाहन : आरटीई २०२२-२३ या वर्षासाठी लॉटरीद्वारा निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी सोमवार ४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४ नंतर आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करणार आहे. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाइलवर एसएमएस प्राप्त होतील, मात्र एसएमएसवर अवलंबून न राहता पालकांनी आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

अशी आहे स्थिती
नोंदणीकृत शाळा - १९६
आरक्षित जागा - १९९५
प्राप्त अर्ज - ६००२
जास्त प्राप्त अर्ज - ४००७

बातम्या आणखी आहेत...