आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती व डॉ. वंदना जगन्नाथ ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या संयुक्त सहकार्याने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी न्यायाधीश के. के. कुरंदरे, न्यायाधीश ठाकरे, अॅड. भारती देशमुख, विधी सेवा समितीचे महाले, पारधी, बार असोसिएशनचे अध्यक्ष सदार, संस्थेचे संचालक डॉ. साजिद शेख, उपप्राचार्य डॉ. अभय भुस्कडे उपस्थित होते.
घरगुती हिंसाचारावर माहिती देताना अॅड. रूपाली राऊत म्हणाल्या की घरातील महिलांनी एकोपा साधल्यास समन्वयाने अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात तर महिलांवरील अत्याचाराबाबत माहिती देताना अॅड. भारती देशमुख म्हणाल्या की महिलांवर होणाऱ्या अत्याचार हे बऱ्याच वेळा घरगुती किंवा ओळखीच्या लोकांकडून होतात त्यावर पांघरून न घालता दोषीला शिक्षा मिळावी, यासाठी समाजाने पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. महिला या सक्षम असून, त्यांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्यास कायदेशीर जटिल प्रश्न दूर होऊ शकतात, अशा भावना डॉ. शेख साजिद यांनी व्यक्त केल्या. महिलांसाठी आलेले नवीन कायदे याविषयी न्यायाधीश कुरंदरे व न्यायाधीश ठाकरे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाला माजी प्राचार्य डॉ. गायत्री मावळे, डॉ. शैलेंद्र पुंड, डॉ. सुनिता कदम, डॉ. सोनाली महाजन, डॉ. अश्विनी वहिले, डॉ. रूपाली दिंडोकार, डॉ. आशिष केचे, डॉ. प्रवीण वक्ते, डॉ. स्नेहा धकिते शारीरिक शिक्षक प्रशांत निकम, मनोहर उगले, मधुकर राठोड, फारुख, रमेश पोहरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्लाझ्मा वक्ते यांनी केले. आभार धनंजय मिश्रा यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.