आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दोन फोटो दोन कथा:एकीकडे बिबट्याच्या हल्ल्यात माणसाचं पिल्लू ठार; तर दुसरीकडे बिबट्याच्या निराधार पिल्लाला दूध पाजताना माणसं...

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गुरुवारी दोन वेगवेगळे चित्र पहायला मिळाले. मानवावर हिंस्त्रप्राण्याचे हल्ले होत असताना दुसरीकडे मानवावे या हिंस्त्रप्राण्याप्रती भूतदयेचे दर्शन घडवले. एकीकडे नंदुरबार जिल्ह्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात माणसाचे पिल्लू ठार झाले तर दुसरीकडे गुरुवारी सकाळी अकोला जिल्ह्यात माणसाने बिबट्याच्या निराधार पिल्लांना जीवनदान दिले. 

पहिले चित्र : बिबट्याच्या हल्ल्यात 6 वर्षीय चिमुकली ठार

तळोदा तालुक्यातील सोजरबार या ठिकाणी पहाटेच्या सुमारास बिबट्याने झोपडीत शिरून एका चार वर्षीय बलिकेस झोपडीतून फरफटत नेले. या दरम्यान त्या बलिकेचा मृत्यू झाला. हिंस्त्रप्राण्याचे मानवावावर होणारे हल्ले हे गंभीरबाब बनली असून वनविभागाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

दुसरे चित्र : बिबट्याच्या निराधार पिल्लाला दूध पाजून दिले जीवनदान 

दुसरीकडे अकोला जिल्ह्यात पातूर वनपरिक्षेत्रात मानवाचे या हिंस्त्रप्राण्याप्रती भूतदयेचे दर्शन घडले. वनपरिक्षेत्रात गुरुवारी सकाळी बिबट्याची चार पिल्ले बेवारस आढळली होती. दरम्यान वनविभागातील रेस्क्यू टीमने या पिल्लांना बकरीचे दूध पाजून त्यांचे संगोपन केले. बराच वेळ प्रतिक्षा करूनही मादी बिबट्या आलीच नाही. अखेर बिबट्याच्या चारही पिल्लांना गोरेवाडा प्रकल्पाकडे हस्तांतरीत केले.