आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लाख 76 हजार घरांना भेटी:जिल्ह्यामध्ये आजपासून कुष्ठराेग आणि क्षयरोग रुग्ण शोध मोहीम

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यासाठी १३ ते ३० सप्टेंबर दरम्यान शोध मोहिम राबणार आहे. या शोधमोहिमेसाठी १०४२ चमू तयार केले असून, यांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील २ लाख ७६,६५९ घरांना भेटी देऊन एकूण २३ लाख ८३ हजार २९४ लोकांच्या सर्व्हेद्वारे कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यात येईल.

निदान न झालेले कुष्ठरुग्णांचा तसेच नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण या मोहिमेअंतर्गत शोधून काढणार आहे. या करीता जिल्हा व ग्रामस्तरावरील आशा व पुरुष स्वयंसेवक, विविध स्तरावरील पर्यवेक्षकांना चमूंमध्ये सहभागी केले आहे. घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घराच्या दरवाजावर खूण करणे, क्षयरोग रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णांच्या थुंकीचे नमूने घेणे, गरजेनुसार छातीचा एक्स-रे घेणे, कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास त्यांची प्राथमिक तपासणी करणे आदी कामे करणार आहेत. या सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या संदीग्ध रुग्णांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.

एका चमूला रोजचे ४५ घरे ः शोधमोहिमेसाठी नियुक्त केलेले चमू घरोघरी भेट देणार आहेत. दररोज एका चमूमार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात २० घरे व शहरी भागात २५ घरांचे सर्वेक्षण करणार आहे. कुष्ठरोगाची लक्षणे ः त्वचेवर फिकट, लालसर चट्टा येणे, त्वचेवर गाठी होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर, तळपायावर मुंग्या येणे, मनगटापासून हात, घोट्यापासून पाय लुळा पडणे, त्वचेला थंड आणि उष्णता जाणीव न होणे, हात पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे. क्षयरोगाची लक्षणे ः दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकी वाटे रक्त येणे, मानेवर गाठ येणे.

बातम्या आणखी आहेत...