आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गो ग्रीन ला 1 टक्क्यापेक्षा कमी ग्राहकांचा प्रतिसाद

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या गो ग्रीन योजनेत ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ईमेलने येणाऱ्या पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना कागदी बिल पाठवणे बंद केले जाते व प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते. ‘गो ग्रीन’ला अकोला परिमंडळातील ग्राहकांचा कमी प्रतिसाद आहे. एकूण ग्राहकांच्या १ टक्क्यापेक्षा कमी ग्राहक सुविधेचा लाभ घेत आहेत.

राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी ११ लाख ५३ हजार ७०३ लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात ऑनलाइन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. या ग्राहकांकडून वीजबिलाच्या भरण्यापोटी एकूण २२३० कोटी सहा लाख एवढी रक्कम भरली आहे. ज्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना महावितरणच्या वेबसाइटवर जाऊन ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करता येते. महावितरणच्या मोबाइल ॲपवरूनही नोंदणी करता येते.

नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला ओटीपी क्रमांक पाठवण्यात येतो. त्यामुळे नेमक्या संबंधित ग्राहकाकडूनच नोंदणी होत असल्याची खात्री होते. त्यानंतर ग्राहकाला त्याने दिलेल्या ईमेल आयडीवर एक लिंक पाठवली जाते. लिंकवर क्लिक करून पडताळणी केली की प्रक्रिया पूर्ण होते. पुढच्या बिलापासून ग्राहकाला त्याची बिले ईमेलने पाठवली जातात व कागदी छापील बिले बंद केली जातात.

ग्राहकाला हवे तेव्हा त्याला ईमेलने आलेल्या बिलाची प्रिंट घेता येते. त्यासोबत सर्वच ग्राहकांना त्यांच्या बिलाविषयी नियम,माहिती देणारे एसएमएसही पाठवले जात आहेत. अकोला परिमंडळात रहिवासी, वाणिज्य, उद्योग, इतर आणि कृषी प्रवर्गातून उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कृषीचे २ लाख ९१ हजार ग्राहक आहेत. कृषी क्षेत्रात ऑनलाइन पेमेंटसाठी अडचणी येऊ शकतात. घरगुती ग्राहकांकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. पण त्यांच्याकडून प्रतिसाद कमी आहे.

अशी आहे परिमंडळाची स्थिती
गो ग्रीन योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांमध्ये पुणे परिमंडळ आघाडीवर आहे. या परिमंडळात ८९,९३६ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्या पाठोपाठ कल्याण ४०,१४४, भांडूप ३४,९१७, नाशिक ३३,१४१ आणि बारामती २६,३९८ यांचा क्रमांक लागतो. अकोला परिमंडळात गो ग्रीन योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या ११,३१० आहे.

ग्राहकांनी करावी बचत
वीज ग्राहकांना ऑनलाइन बिल भरण्यापोटी १० रूपयांची सवलत देण्यात येते. १० हजार ग्राहकांनी जरी ऑनलाइन पेमंेट केल्यास १ लाख रुपयांची बचत होणार आहे. वीज ग्राहकांचा प्रतिसाद वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.-फुलसिंग राठोड.

बातम्या आणखी आहेत...