आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुंभार समाजाला मोफत एक हजार ब्रास माती मिळण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या शिष्ट मंडळाला दिली. कुंभार समाजातर्फे वेळोवेळी अनेक मागण्या स्थानिक प्रशासानामार्फत शासनाकडे करण्यात आल्या. महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतीश दरेकर,कार्याध्यक्ष रमाकांत क्षीरसागर,काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाजाच्या राज्य पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. विविध मागण्यांवर चर्चा झाली. शिष्टमंडळात अकोला जिल्हाध्यक्ष संजय वाडकर सोमनाथ सोनवणे,गणेश आहेर,वसंतराव गाडेकर, मोहन कुंभार, पांडुरंग कुंभार, वसंतराव घोडनदीकर, अजय वीरकर, अर्जुन दळे, शरद दरेकर,सुधीर चांदेकर, अशोक कुंभार, देविदास भालेराव, अरविंद रोकडे, दिनेश दरेकर, नंदकुमार वाघ,संतोष चौलकर, आनंद महाडकर, मनोज बनचरे, सतीश येलमकर, अनंत कुंभार आदी उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात कुंभार समाजाच्या विटभट्टी व मूर्तिकारांवर होत असलेल्या कारवाहीबाबतही संजय वाडकर यांनी ना. थोरात यांच्याशी चर्चा केली. यावर ना. थोरात यांनी सचिवांना चौकशीचा आदेश दिला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.