आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी परिणाम:शहरातील अनधिकृत बॅनर काढण्यासाठी ठाणेदारांचे वीज वितरण कंपनीला पत्र

अकोट7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण कायद्याच्या अंमलबजावणीची जनतेची मागणी

शहरात सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथ,वजिेच्या खांबांवर चौकांl शुभेच्छा, विविध कार्यक्रमांचे अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर लावले जात आहे. ज्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाकारता येत नसल्याने पोलिस प्रशासनाकडून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन वजिेच्या खांबावरील अनधिकृत बॅनर काढण्याची मागणी केली आहे.

शहराला विद्रुप करणाऱ्यांवर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. अनधिकृत बॅनर लावत चमकोगिरी करणाऱ्या भाऊ-दादांनी मनमानीने शासकीय, निमशासकीय, खासगी जागांवर बॅनर, फ्लेक्स उभारून अतिक्रमण केले. अनधिकृत पोस्टर, बॅनर, पताकामुळे शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शहर पोलिसांनी ७ मार्चला वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले. त्यात असे नमूद केले की शहरात वेगवेगळ्या सण-उत्सवानिमित्त चौकात व इतर मार्गावरील विद्युत खांबावर अनधिकृतपणे पोस्टर, बॅनर, पताका लावल्या आहेत. शहर अतिसंवेदनशील असून अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे अनधिकृत पोस्टर काढून कारवाई करावी. वास्तविक वीज वितरण कंपनीचे अधिकारी,कर्मचारी नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात कार्य करतात.

त्यापैकी एकालाही हे अनधिकृत बॅनर पोस्टर खांबावर लावलेले दिसत नाही का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अशातच पोलिस प्रशासनाकडून मुख्यधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील बॅनर ,पोस्टर ,पताका काढण्यासाठी स्मरण पत्र दिले आहेत .मात्र या पत्राला नगरपालिकेकडून केराची टोपली दाखवली जात असल्याची चर्चा असून.एकप्रकारे या फलकांना पालिकेचे संरक्षण मिळत असल्याची चर्चा आहे. पोलीस खबरदारी घेत असले तरी इतर विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे याकडे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांनी इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्याची गरज आहे.

नियमाचे उल्लंघन हा दखलपात्र अपराध
कलम ३ नुसार महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९९५ नुसार नियमाचे उल्लंघन केल्यास दखलपात्र अपराध ठरतो. यासाठी तीन महिन्यांपर्यंत कैद,दोन हजार पर्यंत दंड किंवा दोन्हींची तरतूद आहे. रफी काझी, विधजि्ञ अकोट

बातम्या आणखी आहेत...