आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टडी हब:इक्विनॉक्स स्टडी हबचा परवाना रद्द करुन महापालिकेने लावले सील ; अल्पवयीन मुलीचे विनयभंगप्रकरण

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासात पिडीत विद्यार्थीनी सोबत घडलेल्या प्रकाराचे ठिकाण कोचिंग क्लास व लायब्ररी असल्याचे आढळून आल्याने मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये इक्विनॉक्स स्टडी हबचा परवाना रद्द करुन सील लावण्यात आले. पूर्व झोन अंतर्गत तोष्णीवाल ले-आऊट येथे चौधरी कोचिंग क्लासेसचा व्यवसाय असून, या व्यवसायाच्या आड अल्पवयीन विद्यार्थींनीस अश्लील मॅसेज पाठवणे, विनयभंग करण्याबाबतची तक्रार एका विद्यार्थीनीने दिल्यानंतर या प्रकरणात चौधरी कोचिंग क्लासचा संचालक शेख वसीम शेख जमील याच्या विरूद्ध पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. या कृत्यामुळे चौधरी कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या मुला- मुलीच्या पालकांमध्ये दहशत तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थी व विद्यार्थींनीकरता तोष्णीवाल ले-आऊट येथे इक्विनॉक्स स्टडी हब या नावाने लायब्ररी असून, या लायब्ररीचे २०२०-२०२३ च्या महानगरपालिकेचे टॅक्‍स पावतीवर लायब्ररीचे मालक म्हणून शेख वसीम शेख जमील, शेख नाझीम शेख जमील, शेख तनजीम शेख जमील अशी तिघांची नावे नमूद आहेत. ही बाब पोलिस तपासात निष्पन्न झाली तसेच पिडीत विद्यार्थींनीसोबत घडलेल्‍या प्रकाराचे ठिकाण कोचिंग क्‍लास व लायब्ररी असल्‍याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्‍या आदेशान्‍वये ईक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हबचा मनपा व्‍यवसाय परावाना रद्द करून ईक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हबला मनपा पूर्व झोन कार्यालय आणि बाजार, परवाना विभागाद्वारे सील लावण्‍यात आले. या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, सिव्‍हील लाइन पोलिस स्‍टेशनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, पोलिस उप निरीक्षक प्रभाकर खोंड, सहायक कर अधीक्षक देवेंद्र भोजने, कनिष्‍ठ अभियंता नरेश कोपेकर, तुषार जाने, कृष्‍णा वाकोडे, दीपराज महल्‍ले, दादाराव सदांशिव, बाजार विभागाचे गौरव श्रीवास, रवि निवाने, संजय पाचपोर, निखील लोटे, सुरेंद्र जाधव तसेच पोलिस कर्मचारी आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...