आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव:चीनप्रमाणे आरएसएस, मोदींच्या सत्तेत मानवी हक्कांचे हनन : अॅड. प्रकाश आंबेडकर

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी दिले कोरोना संकटातील दाखले, देशाचे नाक कापले त्यांना पुन्हा सत्तेवर आणणार का?

‘कोरोना काळात हिंदूंना खुश करण्यासाठी मुस्लिम परदेशी पाहूण्यांना टार्गेट करण्यात आले. पूर्ण देशभरात कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. लॉकडाऊन काळात शेकडो कि.मी. पायी चालत नागरिक इकडून तिकडे गेले. त्यांच्या मानवी हक्कांचे हनन चीन प्रमाणे आरएसएस आणि भाजप सरकारने केले. माणुसकीला काळीमा फासणारा हा उद्योग होता,’ अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

आरएसएसच्या विचारांमध्ये माणसांना किंमत नाही. चीनमध्ये जशी माणुसकी नाही, तशीच आरएसएस व बीजेपीच्या राज्यात माणुसकी नाही. पूर्णतः माणुसकीला काळीमा फासणारी घटना शेकडो लोक पायी चालताना घडत होती. त्यांना केंद्राने मदत का केली नाही, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व आरएसएस प्रमुख मोहन भागवत देतील काय? असा प्रश्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. चीनसोबत युद्ध होण्याचे चित्र आहे, असे असताना विजयादशमीच्या दिवशी चीनवर विजयाचा आराखडा केंद्र सरकारने मांडावा, असे आवाहन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने आयोजित आभासी सभेत त्यांनी हे आवाहन केले. सोमवारी अकोल्यासह सर्वत्र धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आभासी कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केला होता, त्यात ते बोलत होते. लॉकडाऊन काळात नागरिक शेकडो कि.मी.पायी चालत गेले. शेकडो लोक रस्त्यावर झोपलेली विदारक परिस्थिती जगासमोर कोरोना काळात आली. परदेशातील नागरिकांची यामुळे मान शरमेने खाली गेली. त्यावेळी पंतप्रधानांनी माणुसकी दाखवली नाही. ज्या मोदी सरकारने देशाचे नाक कापले त्यांना आपण पुन्हा सत्तेवर आणणार आहात का? याचा विचार करण्याची गरज अ‍ॅड.आंबेडकर यांनी व्यक्त केली. बहुजन समाजाचे खरे नेते सम्राट अशोक होते. या देशातील विषमतावादी समाज व्यवस्था नष्ट करण्यासाठी समतावादी समाज व्यवस्था उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन केले. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या सर्व गोष्टी समाजातील प्रत्येकाला मिळाव्या, यासाठी डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बौद्ध धम्म हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. मानसीक गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर बौद्ध धम्म समजेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी नाही तर ते देशाचे कैवारी आहेत, असे मत धम्म मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पी.जे.वानखडे यांनी येथे व्यक्त केले.भारतीय बौद्ध महासभेद्वारे गेल्या ३७ वर्षांपासून विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम अकोल्यात आयोजित करण्यात येतो. यंदा कोरोना संकटात आभासी पद्धतीने हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या आभासी सभेला भंते बी. संघपाल, प्रा. अंजली आंबेडकर, साहिल आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पी. जे. वानखडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, मनीषा बोर्डे, अरुंधती शिरसाट, प्रतिभा भोजने, प्रदीप वानखडे, प्रभा शिरसाट, शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मिरवणूक रद्द

धम्मचक्र प्रवर्तन िदनानिमित्त िनघणारी मिरवणूक व िवराट जाहीर सभा अकाेला क्रिकेट क्लब मैदानावर हाेते. यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिन महाेत्सवाचे ६४ वे वर्ष आहे. दरवर्षी ही िमरवणूक शिवाजी पार्क, टिळक राेड, गांधी राेड, डाॅ. बाबासाहेब अांबेडकर खुले नाट्यगृह, मदनलाल धिंग्रा चाैक (मध्यवर्ती बस स्थानक), टाॅवर चाैक या मार्गाने िनघत क्रिकेट क्लब मैदानावर समाराेप हाेताे. िमरवणुकीत वंचित बहुजन अाघाडीचे नेते अॅड. प्रकाश अांबेडकर सहभागी हाेतात. या वेळी लेझीमसह अन्य खेळांचे सादरीकरण, िवविध देखावेही अनुयायी सादर करतात. मात्र यंदा हेच काहीच नव्हते.