आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लस साठा:जिल्ह्यात कोविडविरोधी लसींचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यतासाठा मर्यादित; ‘कोविशिल्ड’ लसीचे जिल्ह्यासाठी  11 हजार 800 डोसेस शिल्लक

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड या लसीचा साठा संपत आला आहे. जिल्ह्यासाठी केवळ ११ हजार ८०० डोस शिल्लक आहेत. तर इतर लशींचा साठाही मर्यादित शिल्लक असल्याने लसीकरण वाढल्यास तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. कोव्हॅक्सिनचे २६ हजार ८०० डोस शिल्लक आहेत.

उन्हाळ्याच्या दोन ते तीन महिन्यांत लसीकरणाची गती मंदावली आहे. जिल्ह्यातील एकूण लसीकरण अजुनही ५५ टक्क्यांच्या आत आहे. मोहिमेला प्रतिसाद नसल्याने आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील जवळजवळ निम्मे केंद्र बंद केले आहेत. त्यानंतर आता राज्याच्या विविध भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सुरक्षेच्या उपायांबाबत आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये सुरक्षित अंतर मास्कचा वापर आणि लसीकरण या बाबी महत्त्वाच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवरच जिल्ह्यात येत्या काही दिवसांत हर घर दस्तक ही मोहीम राबवून राहिलेल्यांचे लसीकरण करून घेण्यात येणार आहे. मात्र सद्य स्थितीतील उपलब्धता पाहता सर्वाधिक मागणी असणार्‍या कोविशिल्ड लसीचा साठा मर्यादित स्वरुपात शिल्लक आहे. त्यामुळे हर घर दस्तक मोहीम आणि तालुका स्तरावर होणाऱ्या लसीकरण शिबिरांमुळे येत्या काही दिवसांत लस प्राप्त न झाल्यास लसीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

‘कोर्बेव्हॅक्स’चा साठा मुबलक : बालकांसाठी वापरावयाच्या कोर्बेव्हॅक्स लसीचा मुबलक साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. ७९ हजार ६०० डोसेस शिल्लक आहेत. हा साठा शिल्लक असला तरी बालकांच्या गटात लसीकरणाला प्रतिसाद कमी असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...