आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संतुलन:लायन्स क्लब हार्मोनी वाटणार कापडी पिशव्या; पाच हजार कापडी पिशव्या शिवण्यासाठी गरजू महिलांना रोजगार

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला शहरामध्ये प्लास्टिक पिशव्याच्या जागी कापडांच्या पिशव्या वापरा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानात आता लायन्स क्लब ऑफ अकोला हार्मोनी सहभागी झाला आहे. लायन्स क्लब हॉर्मोनीच्या ‘पर्यावरण वाचवा’ अभियाना अंतर्गत प्लास्टिक बंदीसाठी साडयांच्या पिशव्या निर्मितीचे लक्ष्य व प्लास्टिक पिशवीच्या जागी साडयांच्या पिशव्या वापरण्यासाठी जागरूकता अभियान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

या व्यवस्थेत महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी साडयांच्या पिशव्या निर्माण केल्या जाणार आहेत. प्रथम चरणामध्ये ५ हजार कापडी पिशव्या वितरित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २ चे प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, रीजन चेयरपर्सन अश्विन बाजोरिया, जीएसटी कोऑर्डिनेटर इंद्रपाल सिंह बग्गा, जालनाचे टिबडेवाल आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी काय करता येईल, याचे या वेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या उद्घाटन सोहळ्यात लायन्स क्लब अकोला हार्मोनीचे अध्यक्ष सत्यपाल बाशानी, कोषाध्यक्ष नूतन जैन, उपाध्यक्ष डॉ. अनुपम बागडी, क्लबचे सिनियर सदस्य व पर्यावरण डिस्ट्रिक्ट चेयरपर्सन कौशल भाटिया, दर्शन गोयनका, ज्योति गोयनका, महेंद्र खेतान, चंद्रकांत डीवरे, डॉ. दिलीप बिजवल, लता भाटिया, ताहिर अली, यासमीन ताहिर अली, सीए सूरज जेठानी, कमलेश आहूजा आदी उपस्थित होते.

कापडी पिशवी वापरण्याचे संस्थेचे नागरिकांना आवाहन
आज प्रत्येक व्यक्ती हातामध्ये जवळपास २०० ग्रॅमचा मोबाइल फोन घेऊन बाहेर पडतो. मग एक पिशवी आपल्या बँगमध्ये, गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवणे सहज शक्य आहे. पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे. किमान आपल्या येणाऱ्या पिढ्यांना समृद्ध, निरोगी जीवन प्रदान करण्यासाठी, तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने कापडी पिशव्यांचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन यानिमित्त संस्थेने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...