आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मतदान आणि मतमोजणी कालावधीत जिल्ह्यात मद्यविक्री राहणार बंद

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका होत असून, मतदान प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात व्हावी तसेच या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी ,यासाठी मतदानाचा आधीचा दिवस १७ डिसेंबर आिण मतदानाचा दिवस १८ व मतमोजणीचा दिवस .२० रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहतील असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निर्गमित केले आहेत.

हे आदेश ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत त्या ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्री अनुज्ञप्त्यांना लागू आहेत. या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...