आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यातील दोन लाख 12 हजार शेतकऱ्यांची नाेंदणी

अकाेला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत (पीएम-किसान) जिल्ह्यातील जवळपास दोन लाख १२ हजार शेतकऱ्यांनी पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी केली आहे. मात्र ५२ हजार ४६८ शेतकरी लाभार्थ्यांचे खाते आधार संलग्नित ( ई-केवायसी ) झालेले नाही. त्यामुुळे डिसेंबरनंतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत (पीएम-किसान) लाभ िमळण्यासाठी त्यांना केवायसीची प्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजारांचा लाभ या याेजनेच्या माध्यमातून िमळताे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना तातडीने या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग हाेता यावे, यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो.

या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील जवळपास दोन लाख १२ हजार शेतकऱ्यांनी पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी केली आहे.

असे आहे चित्र
ई-केवायसीमध्ये अकोला व अकोट तालुक्यातील शेतकरी माघारलेले आहेत. अकोला तालुक्यातील ९ हजार ७४, अकोट तालुक्यातील ९ हजार ६२३, बाळापूर तालुक्यातील ७ हजार ५०१, मूर्तिजापूर तालुक्यातील ७०५४, पातूर तालुक्यातील ६ हजार ३०२, तेल्हारा तालुक्यातील ६ हजार २८९ व बार्शीटाकळी तालुक्यातील ६ हजार १३५ शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे.

येथे करता येईल प्रक्रिया
1.जिल्ह्यातील ५२ हजार २४८ शेतकरी लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी आहे. त्यानुसार पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सोबत घेवून जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा सेतून केंद्रातही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

2.याबाबत पी-एम किसान पोर्टलवर स्वतंत्र ई-केवायसी टॅब असून, हे टॅब क्लिक करुन आधार क्रमांक टाकून ई-केवायसी प्रक्रिया करता येते. ही प्रक्रिया कमी वेळेची व अत्यंत सुरळीत आहे. त्यानुसार पी-एम किसान योजनेमध्ये समाविष्ट लाभार्थ्यांनी तत्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

बातम्या आणखी आहेत...