आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनें अंतर्गत सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता प्रस्ताव मागविण्यात आले आहे. इच्छुक पात्र वृद्ध व कलाकारांनी आपले प्रस्ताव संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात मंगळवार दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
प्रस्ताव पाठवण्याची काही निकष निश्चित केले आहेत. त्यात साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी मोलाची कामगिरी करणारा असावा, कला व वाड्मय क्षेत्रात ज्यांनी १५ ते २० वर्ष प्रदिर्घ काळाचा अनुभव असावा, कलाकार व साहित्यिकांचे वय ५० वर्ष असावे. अर्धांगवायु, क्षयरोग, कृष्ठरोग, कर्करोग या रोगांनी आजारी असलेला तसेच ४० टक्यापेक्षा जास्त शारिरिक व्यंग किंवा अपघाताने ४० टक्यांपेक्षा जास्त अपंगत्वामुळे स्वत:चा व्यवसाय करु शकत नसतील, अशा साहित्यिक व कलाकारांना वयाची अट शिथील करण्यात येईल. साहित्यिक व कलावंताच्या सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न ४८ हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे. विधवा किंवा परितक्त्या वृद्ध साहित्यिक व कलावंतानी मानधन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
प्रस्ताव दाखल करताना वृध्द साहित्यिक व कलावंत पती किंवा पत्नीचा एकत्रीत पासपोर्ट आकाराचा फोटो सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेला असावा, अर्जदाराचा बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोडची सांक्षाकित प्रत, जन्मतारखेचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला. रोग किंवा अपंगत्वाबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे ऑनलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र, इतर शासकिय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्राची प्रत, कलासंबंधी अनुभव कागदपत्रे, आधार कार्ड, अर्जदाराचे कलाक्षेत्राबाबत परिचय पत्रात वर्षनिहाय उल्लेखनीय कार्याची माहिती. केंद्र, राज्य शासन पुरस्कार प्राप्त असल्यास तसेच सांस्कृतीक संचालनायाकडून पुरस्कार अथवा सन्मात पत्र सोबत जोडावे. साहित्य प्रकाशित झाल्याबाबतचे आवश्यक पुरावे व साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कार अर्जासोबत जोडावे.
अर्जदाराने अर्जामध्ये ज्या कला क्षेत्राचा उल्लेख केला असेल त्या कलाक्षेत्रासंबंधीचे आवश्यक पुरावे, रेडिओ आकाशवाणी प्रसारमाध्यमावरील कार्यक्रमाची माहिती व त्याबाबतचे छायाचित्रे, वर्तमानपत्रे कात्रणे व कला सादरीकरणाचा उल्लेख असावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.