आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था आणि सावित्री फाउंडेशन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राज्यस्तरीय ज्येष्ठ साहित्यिकांचे साहित्य संमेलन स्व. पुरुषोत्तम बोरकर साहित्य नगरी जेआरडी टाटा स्कूल सभागृह स्नेहाशब्द वाटिका समोर बार्शीटाकळी रोड अकोला येथे रविवार, १२ जून रोजी आयाेजित केले आहे.
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर (जळगाव खान्देश) यांची निवड झाली आहे. डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक संजय चौधरी यांची निवड झाली. उद्घाटन सत्रात संत साहित्य अभ्यासक तुळशीराम बोबडे, सुरेश पाचकवडे, वा. पा. जाधव, देवकाताई देशमुख, अॅड. मंगला नागरे, शिक्षणाधिकारी माध्य. डॉ. सुचिता पाटेकर, जयप्रकाश पाटील, शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
साहित्य संमेलनाचा समारोप उद्योजक प्रा. डॉ. संतोष हुशे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. समारोपीय सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. सदाशिव शेळके, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य पुष्पराज गावंडे, शिक्षणाधिकारी प्राथ. वैशाली ठग, प्रा. डॉ. मोहन खडसे, प्रा. डॉ. शिवाजी नागरे, प्रा. मधुकर वडोदे, सुनीता मेटांगे, डॉ. विनय दांदळे आणि दयाराम निंबोळकर प्रमुख अतिथी असतील.
संमेलनाच्या उद्घाटन सत्रानंतर सशस्त्र क्रांतिकारकांचा रोमहर्षक इतिहास जिवंत उभा करणारा व्याख्यान प्रयोग ‘वंदेमातरम्’ प्रा. वसंत गिरी, मेएसो महविद्यालय, मेहकर सादर करतील. तिसऱ्या सत्रात स्व. पुरुषोत्तम बोरकर लिखित ‘मेड इन इंडिया हा’ एकपात्री प्रयोग दिलीप देशपांडे सादर करतील. यानंतर चंद्रशेखर पंडित ‘शब्दाचे बदलते रूप’ यावर भाष्य करतील. चाैथ्या सत्रात शालिग्राम वाडे ज्येष्ठ कवी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न होईल. शशिकांत हिंगोणेकर संमेलनाचे अध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.