आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांत्रिकीकरणाचा परिणाम:पशुधन घटले, शेतीचा कसही गेला ; सात वर्षांत जिल्ह्यातील गोवंशामध्ये 13 टक्के घट

अकोला / महेश घोराळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढते शहरीकरण, यांत्रिकीकरण, निसर्गाच्या लहरीपणा इत्यादी विविध कारणांमुळे जिल्ह्यातील गोधनाची संख्या घटत असल्याचे निदर्शनास येत आहे. २०१२ आणि २०१९ च्या पशुगणनेचा विचार केल्यास गोवंशातील प्राण्यांमध्ये ३५ हजार १५१ म्हणजे १३.१ टक्क्यांनी घट दिसत आहे. त्यामुळे शेतीतील बैलांचा वापरही कमी झाल्याचे दिसून येत आहे.

दोन दशकांपूर्वी बहुतांश शेती ही बैलांच्या भरवशावर केली जात होती. मात्र चारा पाण्याची टंचाई, बदललेली पीक पद्धती, पालन-पोषणाच्या खर्चात झालेली वाढ, शहरीकरण नि यांत्रिकीकरणामुळे गोठ्यातील बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यास बैलजोडी सांभाळण्याचा खर्च परवडत नसल्याने गोधन कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात २०१९ च्या पशुगणनेनुसार २ लाख ३३ हजार २७१ गो वंशातील प्राणी आहेत. यातील निव्वळ बैलांची संख्या ही एक लाखाच्या आत असू शकते, असे अभ्यासक सांगतात.

पशुधन घटल्याने शेतीतील शेणखत वापर घटला. पर्यायाने सेंद्रिय शेतीतील सकसपणा मिळत नाही. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरातून उत्पादित अन्न धान्यातून मानवी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे निव्वळ सेंद्रिय शेतीच्या भरवशावर अन्नधान्याची गरज भागवता येणार नाही. सेंद्रिय शेतीतून अन्नधान्यात गुणात्मकता दिसत असली तर संख्यात्मक वाढ दिसत नाही. असे मतही कृषी अभ्यासक नोंदवितात.

एक लाखाच्या आत असू शकते, असे अभ्यासक सांगतात.
पशुधन घटल्याने शेतीतील शेणखत वापर घटला. पर्यायाने सेंद्रिय शेतीतील सकसपणा मिळत नाही. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरातून उत्पादित अन्न धान्यातून मानवी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे निव्वळ सेंद्रिय शेतीच्या भरवशावर अन्नधान्याची गरज भागवता येणार नाही. सेंद्रिय शेतीतून अन्नधान्यात गुणात्मकता दिसत असली तर संख्यात्मक वाढ दिसत नाही. असे मतही कृषी अभ्यासक नोंदवितात.

गुरांसाठी वैद्यकीय सुविधांचा अभाव
चारा पाण्याच्या अभावासह बदलती मानवी जीवनशैली, प्लास्टिक वापराचा फटका प्राण्यांना सोसावा लागतो. जनावरांमध्ये पोटफुगी, कासेचे, खुराचे आजार, घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकुत आदी विविध आजार आढळून येतात. दरम्यान तज्ज्ञ पशू चिकित्सकांकडून वेळेवर उपचार मिळाल्यास जनावराचा जीव वाचू शकतो. मात्र अजूनही योग्य उपचार मिळत नसल्याने पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो.

सेंद्रिय कर्बावर परिणाम
शेणखताच्या नियमित वापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून सुपीकता वाढण्यास मदत होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. मात्र रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. परिणामी सुपीकतेवर परिणाम होत असून जमिनीचा कस कमी होत आहे.

चारा पिकांमध्ये घट
अकोला जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून चारा पिकांमध्ये घट झाली आहे. यंदा ९६८३ हेक्टरवर ज्वारी, १०९ हेक्टरवर बाजरी व ३५८ हेक्टरवर मक्याचे पीक आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे चारा पिके परवडत नसल्याचे खारपाणपट्टयातील शेतकरी सांगतात.

बातम्या आणखी आहेत...