आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जासाठी लाभार्थ्यांची उद्या‎ होणार निवड:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची कर्ज याेजना‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णासाहेब साठे‎ विकास महामंडळ मर्यादित अकोलाद्वारे थेट‎ कर्ज योजनेअंतर्गत अर्ज मागवले होते.‎ त्यानुसार १५७ पात्र लाभार्थ्यांपैकी ३०‎ लाभार्थ्यांची ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड करण्यात‎ येणार आहे.‎ ही निवड प्रक्रिया बुधवार , १२ एप्रिलला‎ दुपारी १२ वाजता नियोजन भवन,‎ जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. पात्र‎ लाभार्थ्यांने उपस्थित राहावे, असे आवाहन‎ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे‎ विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी‎ केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्ण्णसाहेब‎ साठे विकास महामंडळ मर्यादित अकोलाद्वारे‎ प्रकल्प मर्यादा १ लाख थेट कर्ज योजनेसाठी‎ अर्ज मागवले होते.

जिल्हा कार्यालयासाठी ३०‎ मागणी अर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.‎ त्यामध्ये १५ महिला व १५ पुरुष लाभार्थ्यांचे‎ ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार आहे.‎ तथापि थेट कर्ज योजनेअंतर्गत १६३ अर्ज प्राप्त‎ झाले असून त्यात १५७ अर्ज पात्र तर ६ अर्ज‎ अपात्र ठरवण्यात आले आहे. पात्र‎ लाभार्थ्यांपैकी ११८ पुरुष व ३९ महिला लाथार्थी‎ आहेत. अपात्र लाभार्थ्यांची यादी कार्यालयाच्या‎ नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. पात्र‎ लाभार्थ्यांपैकी ३० लाभार्थ्यांची निवासी‎ उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली‎ ईश्वरचिठ्ठीने निवड करण्यात येणार आहे.‎