आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी नगर पालिका, महापालिका, नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या िनवडणुका िरपाइं (आठवले गट)-भाजप संयुक्तपणे लढणार असल्याचे िरपाईचे प्रदेश सहसंघटक अशाेक नागदेवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. भाजपच्या सर्वच मुद्यांवरील भूमिका मान्य नसून, काही बाबी मान्य असल्याचेही ते म्हणाले. रिपाईच्या िजल्हाध्यक्षपदी सुनील अवचार यांची नियुक्ती करण्याची घाेषणाही करण्यात आली. रिपाईचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे २७ मे राेजी आयाेजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हाेणार असून, अधिवेशात आगामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासह अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा हाेणार आहे.
या अधिवेशनात िजल्ह्यातून ३ हजार कार्यकर्ते सहभागी हाेणार आहेत. िजल्ह्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकर्ता मेळावा हाेणार आहे. या मेळाव्यात पश्चिम िवदर्भातील प्रमुख पदाधिकारीही सहभागी हाेणार आहेत. यात पक्षाच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांचीही घाेषणा हेाणार आहे. अतिक्रमित जमिनीचे पट्टे कायमस्वरुपी दलितांना देण्यात यावे, यासाठी िजल्ह्यात आंदाेलन करण्यात येणार असल्याचा इशाराही अशाेक नागदेवे यांनी दिला.
पत्रकार परिषदेला पक्षाच्या आयटी सेलचे अध्यक्ष पद्माकर वासनिक, युवक आघाडीचे भूषण प्रधान, िवकी कांबळे, प्रेम समुद्रे, िनतीन जाधव उपस्थित हाेते. नगर पालिका, महापालिका, नगर पंचायत िनवडणुका कधीही जाहीर हाेऊ शकतात. िनवडणुकीची पूर्व तयारी म्हणून दाैरे करून उमेदवारांची चाचपणीसाठी सभा, बैठका घेण्यात येणार आहेत, असेही िरपाईचे सहसंघटक अशाेक नागदेवे म्हणाले. मनपात िरपाईला किमान ७ ते ८ जागा सुटणे अपेक्षित आहेत. शिर्डी येथून लढणार ः आगामी लाेकसभा निवडणुकीच्या शिर्डी मतदारसंघातून रिपाईचा उमेदवार लढणार असल्याचे प्रदेश सहसंघटक अशाेक नागदेवे म्हणाले. ही जागा िरपाई भाजपच्या काेट्यातून मागणार आहे. २०१९ च्या िनवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने लढलेल्या या जागेवर शिवसेनेचे उमेदवार िवजयी झाले हाेते. मात्र आता ही जागा रिपाईला हवी आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.