आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:भगवान रामदेवबाबा साक्षात विष्णूचे अवतार : आचार्य श्यामदेव शास्त्री

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामदेवबाबा यांनी आपल्या जीवनकार्यात मानव कल्याणसाठी अनेक अद्भुत लीला करून भक्तांचा उद्धार केला आहे. ते साक्षात भगवान विष्णूचा अवतार आहेत. म्हणून अशा अवतारी देवाचा जयजयकार व सत्संग केल्याने शाश्वत सुखाची प्राप्ती होते. म्हणून भक्तांनी आपल्या लौकिक व पारलौकिक कल्याणासाठी भगवान रामदेवबाबाचे नित्य स्मरण करण्याचा हितोपदेश आचार्य श्यामदेव शास्त्री यांनी केला.

स्थानिय गीता नगर येथील रामदेवबाबा शामबाबा मंदिरात रामदेवबाबा जन्मोत्सव निमित्त प्रारंभ झालेल्या आचार्य श्यामदेव शास्त्री यांच्या रामदेवबाबा कथेस प्रथम दिनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुम्मा गायक विक्की ब्यावत यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेल्या या कथेत आचार्य श्यामदेव शास्त्री यांनी राजस्थानची महिमा व हरजीभाटी या शिष्याची जीवन कथा सादर केली. ते म्हणाले, बाबाचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी केलेल्या गुणगानास जुम्मा जागरण म्हटले जाते. वास्तविक हे जुम्मा जागरण त्यांच्या हयातीच्या वेळी पण समाजात होते. त्यांच्या कोणत्याही भजनात खम्मा खम्मा हे वारंवार म्हटल्या जाते, वास्तविक खम्मा खम्मा या शब्दाचा अर्थ स्तुतिगान करणे होय. ही प्राचीन भारताची शब्दावली असल्याची माहिती आचार्य शास्त्री यांनी या सत्रात दिली. या प्रथम सत्रात पु. शास्त्री यांनी हरजी भाटी या शिष्याची अद्भुत जीवन गाथा आपल्या संगीतमय वाणीत सादर केली.

बाबाने समाधी घेतल्याच्या ३०३ वर्षानंतर जोधपूर येथील औसीया तालुक्याच्या एका गावात हरजी भाटी यांचा जन्म झाला. लहानपणीच हरजीचे आई वडिलांचे देहांत झाले. हरजी पोरके झाले. रानात बकऱ्या चारायला लागले. चौदा वर्षाचे झाल्यावर रानात त्यांची बाबा रामदेवजी यांनी परीक्षा घेत त्यांना साक्षात दर्शन दिले व हरजीचे जीवन कृतार्थ झाल्याची गाथा पु शास्त्री यांनी यावेळी सांगितली. सत्र प्रारंभी उत्सवाचे मुख्य यजमान नथमल गोयनका, पुष्पा गोयनका, तुषार गोयनका यांनी पूजाविधीत सहभाग घेतला. पं. राघव द्विवेदी यांनी या विधीला साकार केले. यावेळी या संगीतमय कथेस संगीत देणारे रोशनलाल, कुलदीप, अनिल, राधा किसन यांचे स्वागत यजमान गोयनका यांनी केले. गायक विक्की ब्यावत यांनी गणेश गुणगान सादर केले. पं. हेमंत दीक्षित यांनी मंत्रोच्चर करीत धार्मिक विधी केली. ५ सप्टेंबर पर्यंत नित्य दु. २.३० ते सायं. ६.३० वाजेपर्यंत कथा वाचक आचार्य श्यामदेव शास्त्री यांच्या रामदेवबाबा प्रवचनाचा भक्तांनी लाभ लेने घेण्याचे आवाहन रामदेवबाबा-शामबाबा सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...