आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Love | Married Women Love 17 Year Boy | Marathi News | Married Woman's Love For 17 Year Old Boy! Absconded With Child; Police Make Arrests

प्रेमप्रकरण:17 वर्षाच्या मुलावर जडले विवाहित महिलेचे प्रेम! मुलासह झाली फरार; पोलिसांनी केली अटक

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमात पडल्यावर माणूस आंधळा होतो असे म्हणतात; पण त्याचबरोबर काही वेळा विचार करण्याची शक्ती देखील गमावून बसतो. २९ वर्षीय विवाहित महिलेबाबत तरी असंच म्हणता येईल. या महिलेचे १७ वर्षीच्या अल्पवयीन मुलावर प्रेम जडले आणि तिच्याकडे सांभाळ करण्यासाठी असलेल्या ९ वर्षाच्या बहिणीच्या मुलीला एकटी सोडून ती फरार झाली. या प्रकरणात एकीकडे मुलाच्या आईवडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तर दुसरीकडे महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दुसऱ्या पोलिस ठाण्यात नोंदवली. अखेर हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

हे प्रकरण आहे खदान व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील. प्रेम (बदललेले नाव) हा खदानच्या हद्दीत राहतो. तर प्रिया (बदललेले नाव) ही कुंभारी येथे राहते. प्रियाचा विवाह झाला असून ती पतीपासून विभक्त झाल्यानंतर एमआयडीसीतील कैलास नगर कुंभारी येथे राहायची. तिची बहीण आणि जावई वारल्याने त्यांची ९ वर्षाची मुलगी जेव्हा पाच वर्षाची होती तेव्हापासून तिचा सांभाळ प्रिया करायची.

३१ जानेवारी रोजी प्रिया अचानक घरून बेपत्ता झाली. तिकडे प्रेमसुद्धा ३१ जानेवारी रोजी बेपत्ता झाला होता. दोघेही खोली करून राहू लागले. इतक्यात प्रेम ९ फेब्रुवारी रोजी घरी परतला. तिकडे एमआयडीसी पोलिसांच्या तपासात महिलेचा शोध लागला आणि तिने आपले प्रेमसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगून टाकले. मात्र, प्रेम सज्ञान नसल्याने त्याच्यासोबत राहून त्याचे लैंगिक शोषण हा कायद्याने गुन्हा ठरत असल्याने प्रकरण महिला बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आले. चौकशीनंतर खदान पोलिसांनी प्रियाविरुद्ध गुरुवारी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली.

...यामुळे उघडकीस आले हे प्रेमप्रकरण
आई-वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा मुलगी पाच वर्षांची होती. तेव्हापासून मावशी प्रिया ही तिचा सांभाळ करायची. ३१ जानेवारीच्या रात्री मुलगी झोपल्यानंतर मावशी बेपत्ता झाली. मुलगी सकाळी उठली तर मावशी दिसली नाही म्हणून ती रडायला लागल्यानंतर घरमालकाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केली व सदर मुलीला बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले. तेव्हापासून या प्रकरणाचा कसोशीने तपास करण्यात आल्याने या प्रकरणाचा छडा लागला.

बातम्या आणखी आहेत...