आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरे दगावली:लम्पी चर्मरोगाने अनेक जनावरे दगावली; लम्पी मुळे 163 जनावरे दगावली

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात वाढलेला लम्पीचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान अकोट तालुक्यात अजूनही १२३४ बाधित पशू सक्रिय आहेत. तर आतापर्यंत ३ हजार ३०८ बाधित पशू आढळले आहेत.

जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या पशूंमधील लम्पी चर्मरोगाने अनेक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अकोट आणि तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लम्पी बाधित पशू आढळून आले आहेत. पंचायत समिती अकोट येथील पशुधन विकास अधिकारी यांच्या माहितीनुसार तालुक्यात सद्यस्थितीत लम्पीचा संसर्ग नियंत्रणात येत आहे. बाधित पशूंवर उपचार करण्यात येत आहेत. ज्या पशूंमध्ये गंभीर लक्षणे आहेत. त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेऊन उपचार केले जात आहेत.

अकोट तालुक्यातील स्थिती
लम्पीची लागण झालेली जनावरेे ३३०८
उपचाराधीन पशूंची संख्या १२३४
आतापर्यंत दगावलेली जनावरे १६३
दगावलेल्या गाईंची संख्या ९३
दगावलेल्या बैलांची संख्या ७०

उपचारास प्रतिसाद
अकोटमधील लम्पी चर्मरोगाचा संसर्ग नियंत्रणात येत आहे. अनेक पशू उपचाराला प्रतिसाद देऊन बरे होत आहेत. दुदैवाने आतापर्यंत एकूण १६३ जनावरे दगावली आहेत.- डॉ. प्रसाद खोडवे, पशुधन विकास अधिकारी, पं. स. अकोट.

बातम्या आणखी आहेत...