आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुधन संकटात:लम्पीने 1250 वर जनावरे दगावली; जिल्ह्यात मृत्यूचे सत्र रोखण्याचे आव्हान

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिबंधात्मक उपाययोजना, गोचिड, गोमाशा निर्मूलन तसेच प्रतिबंधात्मक लसीकरण आदी बाबींवर काटेकोर कामाचा दावा करणाऱ्या पशुसंवंर्धन विभागासमोर लम्पी चर्मरोगाने आव्हान उभे केले आहे. दररोज वाढणारे बाधित पशू आणि मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या चिंताजनक बनत आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून लम्पीचा संंसर्ग झपाट्याने वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या जात असल्या तरी कमी मनुष्यबळामुळे अनेक मर्यादा येत आहेत. गेल्या काही वर्षातील लम्पी चर्मरोगाचा विचार केला तर यंदा मृत्यू आणि संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अजूनही जिल्ह्यात बाधित पशुंची संख्या वाढत आहे. शिवाय मृत जनावरांची संख्याही १२०० च्या वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात ३०३ पशू गंभीर अवस्थेत : जिल्ह्यात आतापर्यंत लम्पीच्या संसर्गाने बाधित झालेल्या पशूंची संख्या ही तब्बल २४ हजार ६७८ वर पोहोचली आहे. यापैकी १९ हजार ८८३ पशू उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १ हजार २५३ पशू उपचारादरम्यान दगावलेले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ५४२ पशूंवर उपचार सुरू आहेत. तर ३०३ पशू गंभीर अवस्थेत आहेत.

तीन तालुक्यात सर्वाधिक मृत्यू : जिल्ह्यातील अकोट, बाळापूर आणि तेल्हारा तालुक्यात लम्पीचा फैलाव आणि दगावलेल्या पशूंची संख्याही चिंताजनक आहे. तीनही तालुक्यात प्रत्येकी साडेचार हजारांहून अधिक जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यात प्रत्येकी ३०० पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला तर बाळापूर तालुक्यात २५० जनावरे दगावले आहेत.

लम्पीने दगावलेल्या पशूबदल्यात अशी मिळते मदत : दुधाळ गाय : ३० हजार, ओढकाम करणारा बैल : २५ हजार, वासरू : १६ हजार रुपये आतापर्यंत मंजूर झालेले प्रस्ताव : मोठी दुधाळ जनावरे - २६१, ओढकाम करणारी जनावरे - २४८, वासरे - १३९, एकूण जनावरे - ६४८, रक्कम जमा झालेल्या प्रस्तावांची संख्या - २७४, ३७४ प्रस्तावाचे पैसे लवकरच पशुपालकांच्या खात्यात जमा होतील. पशुपालकांना ६९ लाख ८३ हजारांची मदत : दगावलेल्या पशूंबाबत १ कोटी ६२ लाखांचे प्रस्ताव आजपर्यंत प्राप्त, पशुपालकांच्या खात्यात ६९ लाख ८३ हजार जमा झालेे आहेत, १ लाख २८ हजारांचे सहाय्य पशुपालकांना प्राप्त होईल.

मनपा हद्दीत ‘लम्पी’सदृश जनावरे मोकाट : महापालिकेच्या हद्दीत वावरणाऱ्या अनेक मोकाट जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगासारखी लक्षणे आढळून येत आहेत. पशूंच्या अंगावर ठिकठिकाणी गाठी पाहायला मिळत आहेत. मात्र मोकाट जनावरांसंदर्भात विलगीकरण आणि उपचाराची कोणतीही सोय असल्याचे दिसत नाही. त्यामुळे शहरात होणाऱ्या लम्पीच्या फैलावाकडे यंत्रणेचे लक्ष आहे का ? हा प्रश्न आहे. शहरातील सर्व मोकाट जनावरांना एकत्र ठेऊन निगराणीत त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. मात्र असे होताना दिसत नाही.

लम्पीच्या संसर्गात पावसामुळे वाढ
जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण झाले आहे. दिवसरात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना, विलगीकरण, जनजागृती याबाबत ग्रामीण भागात युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे. गेल्या महिन्यातील पावसामुळे जनावरांना लम्पीच्या संसर्गात वाढ झाली डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अकोला.

गोठे, ३७ गोशाळांत लसीकरण
ग्रामीण भागात खासगी गोठ्यांसह गोशाळांत लम्पीचा संसर्ग वाढताच जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण मोहिम हाती घेऊन लसीकरण पूर्ण केले आहे. गोरक्षण संस्था पशू वैद्यकीय पथकाच्या निगरणीत आहेत. जिल्ह्यात ३७ गोशाळा संस्था असून, यातील जनावरांची संख्या ही ४ हजार ५२३ आहे.

तालुकानिहाय स्थिती अशी
तालुका बाधित पशू मृत्यू
अकोला ३९५० १४४
अकोट ५९४८ ३२४
बाळापूर ४४४५ २५०
बार्शीटाकळी १२४४ ६३
पातूर १५९१ ५९
मूर्तिजापूर १८५३ ७६
तेल्हारा ५६४७ ३३७
एकूण २४६७८ १२५३

बातम्या आणखी आहेत...