आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्ह्यात लम्पीचा फैलाव:26 गावांमध्ये 383 जनावरांना लागण, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी त्वचा रोग या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी गुरुवारी, 1 सप्टेंबरला आयोजित बैठकीत दिले आहेत.

लम्पी त्वचा रोगःप्रतिबंध व उपाययोजनांबाबत सर्व पशुवैद्यकीय अधिकारी तसेच महसूल व ग्रामविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जी. एम. दळवी, सहा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावने, डॉ. बाळकृष्ण धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे सर्व सहा. आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ. बुकतरे यांनी जिल्ह्यातील लम्पी त्वचा रोग या जनावरांमधील आजाराबाबतच्या सद्यस्थितीची माहिती सादर केली. त्यानुसार, जिल्ह्यात 26 गावांमधील जनावरांमध्ये या आजाराने संक्रमित जनावरे आढळली आहेत. आतापावेतो 383 जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. उपचारानंतर 294 जनावरे बरी झाली आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत या आजाराने एकही जनावर दगावलेले नाही. प्रादूर्भाव झालेल्या ठिकाणांच्या 5 किमी त्रिज्या परिसरात 92 गावे आढळली आहेत. तेथे लसीकरणाचे काम सुरू आहे.

जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या..

  • हा आजार संसर्गजन्य असून बाधीत व अबाधीत जनावरांचा संपर्क येऊ न देण्यासाठी काळजी घ्या.
  • गोठ्यांचे निर्जंतूकीकरण, गोचिड गोमाशांचे निर्मूलन या सारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्या.
  • त्यासाठी ग्रामपंचायतस्तरावरील यंत्रणेने समन्वय राखून कामे पूर्ण करावीत.
  • लसीकरण व उपचार राबवित असतांना अन्य जनावरांमध्ये फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा.
  • लसींचा अधिकचा साठा मिळविण्याचे नियोजन करावे.
  • बाधीत जनावरे असलेल्या ठिकाणापासून 10 किमी त्रिज्या परिसरातील गुरांचे बाजार भरविण्यात येऊ नये.

रोगाची कारणे व प्रादुर्भाव

  • गोवंश आणि म्हैस वर्गात होणारा विषाणूजन्य, संसर्गजन्य त्वचारोग आहे.
  • या विषाणूचे शेळ्या मेढ्यांमधील देवीच्या विषाणूशी साम्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या मेंढ्यांना होत नाही.
  • हा आजार जनावरांपासून मानवास होत नाही.
  • या आजाराची देशी वंशाच्या जनावरापेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याचे प्रमाण अधिक असते.
  • उष्ण आणि दमट हवामान रोगप्रसार होण्यास अधिक पोषक असते.

जनावरांचे नुकसान

या आजाराचा रोग दर हा सर्वसामान्यपणे 10- 20% तर मृत्यूदर 1-5% पर्यंत आढळून येतो. आजारामुळे होणाऱ्या मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होत जातात, त्यांचे दुग्ध उत्पादन मोठया प्रमाणावर घटते, तसेच काही वेळा गाभण जनावरात गर्भपात होतो आणि प्रजननक्षमता घटते.

बातम्या आणखी आहेत...