आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाख रुपयांचा दंड:वीज चाेरीप्रकरणी 19 ठिकाणी महावितरण कंपनीची कारवाई

अकाेला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण कंपनीतर्फे कारवाई करण्यात येत असून, प्रशासनातर्फे बाळापूर तालुक्यात १९ ठिकाणी वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. मागील महिन्यातही महावितरणकडून या भागात २१ वीज चाेरीच्या प्रकरणांचा पर्दाफाश करण्यात आला हाेता. वीज चोरांकडून सुमारे सहा लाख रुपयांच्या वीज देयकासह १ लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.

महावितरणच्या एकूण महसुलाचा ८५ टक्के खर्च हा वीज खरेदीवर होत असतो. उर्वरित १५ टक्क्यात कर्मचाऱ्यांचे वेतन, कार्यालयीन खर्च व इतर सर्व कामासाठी होतो. मात्र टाळेबंदीनंतर , वीज बिल वसुलीचे चक्रच थांबल्याने महावितरणसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशातच वीज चाेरीचे प्रमाणही कमी नाही. त्यामुळे िवद्युत चाेरीचे प्रकार राेखण्यासाठी महावितरणतर्फे कारवाईचे सत्र राबवण्यात येत आहे. वीज चाेरीला अाळा बसण्यासाठी महावितरण कंपनीच्या कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत. येत्या काळात महावितरणकडून जिल्ह्यातील अन्य तालुक्यात अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

याठिकाणी केली कारवाई
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महावितरणच्या बाळापूर उप विभागात येणाऱ्या बाळापूर शहर, पारस, खिरपुरी बुद्रुक, हाता, हिंगणा,देगाव,कुप्ता या ठिकाणी अनधिकृतपणे वीज वापर करण्याऱ्या वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. यापूर्वीही या अगोदर थकबाकी मुळे येथील वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित केला होता. देयकाचे पैसे न भरता आकडे टाकून वीज वापर करीत असल्याचे महावितरण प्रशासनाला आढळून आले. बाळापूर मध्ये ५, खिरपुरीत २, हाता ३, हिंगणा २, देगाव ५ ठिकाणी महावितरणकडून कारवाई करण्यात आली. गत वीस िदवसात ही कारवाई करण्यात आल्याचे महावितरण कंपनीने कळवले आहे.

उपकरणांवर परिणाम
विद्युत पुरवठाच्या मागणी वाढल्याने वीज यंत्रणेवर भर वाढला आहे. मात्र आकडे टाकून आणि वीज मीटरमध्ये छेडछाड करून काही जण वीज चोरी करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...