आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पनिशमेंट:महाबीज झाला नाराज अधिकाऱ्यांचा थांबा; पनिशमेंट मिळतेय शेतकऱ्यांना

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांचे महामंडळ, शेतकऱ्यांची संस्था अशी ओळख असलेल्या महाबीजची गेल्या काही महिन्यांपासून नाराज आयएएस अधिकाऱ्यांचा थांबा अशी ओळख होताना दिसत आहे. महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा होते. अधिकारी येऊन तात्पुरते रुजू होतात आणि येथून सोयीच्या आवडत्या जागेचा शोध सुरू करतात. काही आठवडे किंवा महिन्यात इतरत्र बदलूनही जातात.

त्यामुळे प्रशासनाच्या या मनमानीची पनिशमेंट शेतकऱ्यांना का, असा सवाल उपस्थित होत आहे. जबाबदार अधिकारीच नसल्याने महाबीजचा कारभारही ढेपाळल्यासारखा झाला आहे. दरम्यान राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे शुक्रवार, २ सप्टेंबरला महाबीज भवन येथे बैठक घेणार आहेत. त्यामुळे या कारभाराची घडी बसवण्यासंदर्भात ते विचारविनिमय करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अकोल्यात मुख्यालय असलेल्या महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. मात्र, अनेकदा वरिष्ठ आयएएस अधिकारी या पदावर काम करण्यास इच्छुक नसतात हे आतापर्यंतच्या कार्यकाळावरून दिसून येते. त्यामुळे महाबीजला बदली होताच अधिकारी पुन्हा इतरत्र बदलीसाठी प्रयत्न सुरू का करतात व काही महिन्यात इतरत्र बदली होते. या बदल्यांच्या खेळामुळे महाबीजच्या कारभारावर परिणाम होताना दिसत आहे. अपवाद वगळता येथे एकही अधिकारी कार्यकाळ पूर्ण करत नसल्याने या संस्थेविषयी शासन आणि अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही का? भरकटलेलं जहाज अशी प्रतिमा निर्माण झालेले महाबीज हे शासनाला बंद करायचे आहे का?

अतिरिक्त कार्यभार संतोष आळसे यांच्याकडे
सद्यस्थितीत महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त पदभार डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोलाचे सहसंचालक संतोष आळसे यांच्याकडे सोपवलेला आहे. ते २७ जुलैला रुजू झाले आहेत. प्रधान सचिव (कृषी) यांच्या सल्ल्याने यासंदर्भातील आदेश काढण्यात आले होते. महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदांवर आतापर्यंत आयएएस अधिकारी राहिले आहेत. मात्र आता प्रथमच बिगर आयएएस अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार आला, हे विशेष.

अशा झाल्या नियुक्त्या अन् बदल्या
डिसेंबर २०२० मध्ये अनिल भंडारी यांची बदली.
जी. श्रीकांत यांची १७ फेब्रुवारी २०२१ ला नियुक्ती आठवडाभरातच बदली.
डॉ. राहुल रेखावार ८ एप्रिल २०२१ ला रुजू. तीन महिन्यातच कोल्हापूरला जिल्हाधिकारी म्हणून बदली.
जितेंद्र पापळकर यांची १३ जुलै २०२१ ला नियुक्ती. रुजू नाही.
३० जुलैला २१ एमडीपदी रुचेश जयवंशी यांची नियुक्ती. काही महिन्यानंतर सातारा जिल्हाधिकारी म्हणून बदली.
आता अतिरिक्त पदभार डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोलाचे सहसंचालक संतोष आळसे यांच्याकडे.
२७ जुलैला रुजू झाले आहेत. प्रथमच बिगर आयएएस अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...