आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयीची वानवा:शिवमहापुराण कथास्थळासह‎ मार्गावर अनेक सुविधांचा अभाव‎, वैद्यकीय‎ पथक हवे‎

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला‎ पातूर राेडवरील म्हैसपूर येथे सुरू‎ असलेल्या शिवमहापुराण, श्रीमद‎ भागवत कथा यज्ञाच्या ठिकाणी,‎ वाशीम बायपासपासून कथा स्थळी‎ पाेहाेचण्यापर्यंत अनेक सुविधांचा‎ अभाव असल्याचे शनिवारी दिसले.‎

भाविकांची गर्दी लक्षात घेता सर्वांना‎ कथा श्रवण करणे साेयीचे जावे, या‎ अनुषंगाने मंडप टाकणे आवश्यक हाेते.‎ मात्र अनेकांना उन्हात उभे राहूनच‎ कथा श्रवण करावी लागली. परिणामी‎ पंडित प्रदीप मिश्रा यांनाच‎ आयाेजकांना मंडप टाकण्याची सूचना‎ करावी लागली.

नक्की प्रकरण काय?

म्हैसपूर येथे पं.‎ प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण‎ कथेला शुक्रवारी ५ मे राेजी प्रारंभ झाला. ४० एकर‎ जागेवर मुख्य कथामंडप उभारला आहे. मुख्य कथा‎ मंडपाच्या थाेड्याअंतरावर भक्तांसाठी‎ जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र भक्तांना सुविधा नसल्याने गैरसोय सहन करावी लागली. भक्त जमिनीवर अन्‎ उन्हात तर पाेलिस सावलीत खुर्च्यांवर हाेते.‎

प्रकृती बिघडली; भाविकच धावले‎

कथा सुरू हाेण्यापूर्वी कथास्थळी‎ निघालेल्या दाेन महिलांसाेबतच्या लहान‎ मुलींना उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांना‎ रस्त्याच्या कडेला बसून पाणी देण्यात आले.‎ कथा संपल्यानंतर घराकडे जात‎ असलेल्या एका वृद्धाची प्रकृती बिघडली. या‎ वृद्ध भाविकास अन्य भाविकांनी ओआरएस,‎ लिंबू पाणी दिले. तेथून जात असलेल्या एका‎ कारमध्ये बसून या वृद्ध भाविकास मार्गस्थ‎ करण्यात अाले.‎

वाहतुकीचे तीन-तेरा

वाशीम‎ बायपासकडून पातूर राेडकडे जाणारी जड‎ वाहतूक बंद केली अाहे. मात्र कथा‎ व्यवस्थापनेशी संबंध नसलेली‎ (भाविकांसह) काही वाहने या मार्गावरून‎ धावत हाेती. वाहतूकीच्या कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.